PM Modi : AIमध्ये भारताच्या प्रगतीचे जग करत आहे कौतुक – पंतप्रधान मोदी

PM Modi

भारताने अवकाश विज्ञानात एक नवा इतिहास रचला आहे. असंही मोदी म्हणाले.


विशेष प्रतिनिधी

PM Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज(रविवार) देशवासीयांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या. मन की बातचा हा ११९ वा भाग होता. हा २०२५ या वर्षामधील दुसरा भाग आहे. या आधी पंतप्रधान मोदींनी १९ जानेवारी रोजी देशवासीयांशी मन की बात मधून संवाद साधला होता.PM Modi

पंतप्रधा मोदी म्हणाले, भारताने अवकाश विज्ञानात एक नवा इतिहास रचला आहे. अंतराळ क्षेत्रात भारताची सुरुवात खूपच सामान्य होती. इस्रोच्या यशाची व्याप्ती बरीच मोठी आहे. ४६० उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले आहेत. यामध्ये इतर देशांचे उपग्रह देखील समाविष्ट आहेत. यामध्ये महिला शक्तीचाही समावेश करण्यात आला आहे. आगामी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्याबद्दल चर्चा झाली आहे.

तसेच भारत एआयच्या क्षेत्रातही नवीन उंची गाठत आहे. अवकाश क्षेत्र असो किंवा AI, तरुणांचा सहभाग वेगाने वाढत आहे. भारताच्या AI मधील प्रगतीचे जग कौतुक करत आहे. असंही मोदींनी सांगितले.

८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. सर्व विद्या देवीच्या विविध रूपांची अभिव्यक्ती आहेत. मुलींचा आदर करणे हे सर्वात महत्त्वाचे राहिले आहे. हंसा मेहताजींनी संविधान सभेत महिलांच्या भूमिकेबद्दल उल्लेख केला होता. पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांचे इंस्टाग्राम आणि एक्स हे अकाउंट एका दिवसासाठी देशातील महिलांना समर्पित असले. हा प्लॅटफॉर्म माझा असेल परंतु त्यांचे अनुभव आणि आव्हाने ८ मार्च रोजी माझ्या एक्स आणि इंस्टाग्राम अकाउंटद्वारे तिथे शेअर केली जातील.

The world is appreciating Indias progress in AI PM Modi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात