‘मुख्यमंत्री ममता यांच्या अपयशामुळे झाला हिंसाचार’, NHRC टीमचा मोठा खुलासा!

पोलिसांनी आपले काम चोखपणे केले नसल्याचेही सांगण्यात आले आहे.

विशेष प्रतिनिधी

कोलकाता : एनएचआरसीच्या फॅक्ट फाइंडिंग टीमने सोमवारी (१० एप्रिल) पश्चिम बंगालमध्ये रामनवमी मिरवणुकीत झालेल्या हिंसाचारप्रकरणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर अनेक प्रश्न उपस्थित केले. या टीमचे मुख्य निवृत्त न्यायमूर्ती एल नरसिम्हा रेड्डी म्हणाले की, पश्चिम बंगालमधील हावडा आणि हुगळीत झालेल्या हिंसाचारासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे अपयश जबाबदार आहे. ते म्हणाले की, पश्चिम बंगाल सरकारने सर्व नियमांचे उल्लंघन केले आहे. The violence caused by Chief Minister Mamatas failure is a big revelation of the NHRC team

मानवी हक्काखाली त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, ‘’मुख्यमंत्री ममतांच्या अपयशामुळे राज्यात हिंसाचार झाला.’’ याशिवाय गेल्या आठवड्यात पश्चिम बंगालमधील हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी NHRC टीम हुगळीला पोहोचली होती, तेव्हा बंगाल पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यापासून रोखले होते.

हिंसाचारग्रस्त भागांना भेट देण्यापासून रोखण्याचे प्रयत्न –

पाटणा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश नरसिम्हा रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील सहा सदस्यीय तथ्य शोध पथकाला बंगाल पोलिसांनी हिंसाचारग्रस्त हुगळी जिल्ह्यात जाण्यापासून रोखले. या प्रकरणी न्यायमूर्ती रेड्डी म्हणाले होते की, ‘’पोलीस म्हणत आहेत की सीआरपीसीचे कलम १४४ लागू करण्यात आले आहे, पण येथे काहीही नाही. ते उघड होणार असल्याने सरकार घाबरले आहे.’’

गेल्या आठवड्यात पश्चिम बंगालच्या हावडा आणि हुगळीत रामनवमीच्या मिरवणुकांवर दगडफेक आणि बॉम्बफेक यासारख्या घटनांमुळे हिंसाचार उसळला होता. समाजकंटकांनी दुकानांपासून अनेक सार्वजनिक मालमत्तांना आग लावली होती. एवढेच नाही तर रामनवमीच्या हिंसाचारात मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले होते. हिंसाचाराच्या या प्रकरणांमध्ये आतापर्यंत ३० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे.

The violence caused by Chief Minister Mamatas failure is a big revelation of the NHRC team

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात