विशेष प्रतिनिधी
दिल्ली : सयामी जुळ्या बहिणींचे नाव तुम्ही ऐकलं असेलच. या जुळ्या बहिणींची शरीरे देखील एकमेकाला जोडली होती. ह्या दोघींचा शस्त्रक्रिया करून वेगळे करण्यात डॉक्टरांना यश आले होते. पण बरीच अशी जुळी बहीण भावंडे असतात ज्यांची शरीरे जन्मतः एकमेकांसोबत जोडलेले असतात.
The twin brothers, who were abandoned by their parents, were given jobs by the Punjab government
पण शरीरातील काही अवयव कॉमन असल्यामुळे डॉक्टरांना त्यांच्यावर शस्त्रक्रिया एकूण वेगळे करणे कठीण जाते. ह्या दोघांकमध्ये फक्त लिव्हर आणि पित्ताशय कॉमन आहेत. बाकी सर्व अवयव वेगळे आहेत.
पंजाबमध्ये असेच दोघे जुळे भाऊ आहेत. ज्यांचं नाव आहे सोहना आणि मोहणा. 14 जून 2003 मध्ये या दोघांचा जन्म दिल्लीमध्ये सुचेता कृपलानी रुग्णालयामध्ये झाला. जन्मतःच त्यांचे शरीर जोडलेले असल्यामुळे आईवडिलांनी त्यांना सोडून दिले.
ऐकावं ते नवलंच : ह्या जुळ्या बहिणी एकाचवेळी गर्भवती होण्यासाठी करताहेत प्रयत्न, दोघींचा बॉयफ्रेंडही एकच आहे
डॉक्टरांनी मग पिंगळवाडी चॅरिटेबल ट्रस्टला संपर्क करून या नवजात बालकांना सांभाळण्याची जबाबदारी दिली. तेव्हापासून ते तेथेच होते. नुकताच त्या दोघांनी आपले इलेक्ट्रिक डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले आहे. या जोरावरच त्यांना पंजाब इलेक्ट्रिक पॉवर हाऊस मध्ये नोकरी मिळाली आहे.
महिन्याला 20000 पगारदेखील त्या दोघांना मिळणार आहे. 11 डिसेंबरला त्या दोघांना अपॉइंटमेंट लेटर देण्यात अाले हाेते. पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशनमध्ये नोकरी मिळाल्यामुळे दोघे प्रचंड खूश आहेत. ही नोकरी दिल्याबद्दल त्यांनी पंजाब सरकारचे आभार मानले आहे. त्याचप्रमाणे त्यांचा सांभाळ करणार्या चॅरिटेबल ट्रस्टचे देखील त्या दोघांनी आभार मानले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App