प्रतिनिधी
मुंबई : राज्यसभेत गैरवर्तनाबद्दल सभापती व्यंकय्या नायडू यांनी 12 खासदारांना एका अधिवेशनासाठी निलंबित केले आहे. त्यावरून देशभरात राजकीय गदारोळ उठला असून निलंबित शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी या घटनेवर लोकशाहीची हत्या अशा शब्दात हल्लाबोल केला आहे. आम्ही जनतेचा बनलो. जनतेचे मुद्दे आम्ही उपस्थित करत होतो म्हणूनच आम्हाला निलंबित केले, असा दावा प्रियंका चतुर्वेदी यांनी केला आहे.The suspension of 12 MPs is a murder of democracy
तर त्याला भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजय लाटकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत अध्यक्षयांविषयी कथित गैरव्यवहार काढल्याने केल्याने 12 आमदारांचे वर्षभरासाठी निलंबन करण्यात आले तेव्हा लोकशाहीची हत्या झाली नव्हती. पण आता राज्यसभेत गैरवर्तन केल्याबद्दल 12 खासदारांचे निलंबन केले की लगेच “लोकशाहीची हत्या” झाली… हा तर भारतातल्या तथाकथित सेक्युलारांचा ढोंगीपणा आहे अशा शब्दात विजय रहाटकर यांनी प्रतिहल्ला चढवला आहे.
महाराष्ट्र विधानसभेत 12 आमदारांनी अध्यक्षांवर अत्यंत अश्लाघ्य शेरेबाजी केल्याने त्यांना निलंबित करण्यात आलेय. भाजपने कायमच कायद्याचा भंग केला आहे. काही लोकांची कायदेभंग करणे ही जीवन पद्धतीच राहिली आहे : शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी
महाराष्ट्राच्या विधानसभेत 12 आमदारांनी कथित अपशब्द वापरल्याने त्यांचे वर्षभरासाठी निलंबन. राज्यसभेत गैरवर्तनासाठी 12 खासदारांचे एकाच अधिवेशनापुरते निलंबन. तरी ही “लोकशाहीची हत्या”.!! हे तर तथाकथित सेक्युलरांचे अंगभूत ढोंग : भाजप राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App