वृत्तसंस्था
नवी दिल्ली : नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपातून दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक जी. एन. साईबाबाची सुटका करण्याच्या मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने साईबाबा यांना निर्दोष ठरविले होते. त्या निर्णयाला शिंदे फडणवीस सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. आजच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिल्याने राज्य सरकारला दिलासा दिला आहे. The Supreme Court stayed the release of Professor Saibaba, who was associated with Naxalites
उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती
नागपूर खंडीपीठाने प्राध्यापक साईबाबावर आरोप पत्र ठेवण्यास खूप विलंब झाला आहे या केवळ तांत्रिक मुद्द्याच्या आधारे त्याला निर्दोष ठरवून सुटकेचे आदेश दिले होते. परंतु, हे आदेश राज्य सरकारला मान्य नव्हते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये त्या संदर्भातला खुलासा केला होता. त्यानुसार राज्य सरकार सुप्रीम कोर्टात गेले होते. सुप्रीम कोर्टाने आज सुनावणी घेताना मुंबई हायकोर्टाचा निर्णय स्थगित केला. त्यामुळे प्राध्यापक साईबाबाची सुटका टळली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App