संपूर्ण देशात सध्या ऑक्सिजनचा तुटवडा आहे. अनेक रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू होत आहे. यावर मात करण्यासाठी देशातील पोलाद उद्योग मदतीला धावला आहे. देशातील पोलाद कारखान्यांनी आॅक्सिजन निर्मितीचे आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडून दिवसाला ३,४७४ टन लिक्विड ऑक्सिजन निर्मिती सुरू केली आहे. या उद्योगाची वास्तविक क्षमता केवळ २८३४ मेट्रिक टन ऑक्सिजन आहे.The steel industry broke production records to overcome the oxygen crisis
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संपूर्ण देशात सध्या ऑक्सिजन चा तुटवडा आहे. अनेक रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू होत आहे. यावर मात करण्यासाठी देशातील पोलाद उद्योग मदतीला धावला आहे.
देशातील पोलाद कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मितीचे आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडून दिवसाला ३,४७४ टन लिक्विड ऑक्सिजन निर्मिती सुरू केली आहे. या उद्योगाची वास्तविक क्षमता केवळ २८३४ मेट्रिक टन ऑक्सिजन आहे.
देशातील पोलाद उद्योगांत एकूण ३३ ऑक्सिजन प्रकल्प आहेत. त्यापैकी २० प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहे. शनिवारी भारतातील पोलाद उद्योगाने मिळून ३४७४ टन ऑक्सिजनची निर्मिती केली. त्यामुळे गरजू रुग्णांना ऑक्सिजन मिळणे शक्य होणार आहे.
पोलाद मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकानुसार देशातील ३३ पैकी २९ ऑक्सिजन प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने निर्मिती सुरू झाली आहे. बहुतांश प्रकल्पातून नायट्रोजन आणि अरगॉनची निर्मिती बंद करून केवळ लिक्विड मेडीकल ऑक्सिजन बनवायला सुरूवात केली आहे.
या सगळ्या प्रयत्नांमुळे २४ एप्रिलपर्यंत विविध राज्यांना २,८०४ टन लिक्विड ऑक्सिजन रवाना करण्यात आला आहे. आत्तापर्यंत हे प्रमाण १५०० ते १७०० मेट्रिक टन होते. हे उत्पादन आणखी वाढविण्यात येणार आहे, असे पोलाद मंत्रालयाने म्हटले आहे.
सार्वजनिक आणि खासगी प्रकल्प दिवसरात्री म्हणजे २७ बाय ७ चालू आहेत. लिक्विड ऑक्सिजन चा पुरवठा करण्याबरोबरच थेट सिलेंडमध्ये ऑक्सिजन भरून रुग्णालयांना पुरविले जात आहे.
स्टिल ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (सेल) या केंद्र सरकारच्या उपक्रमातून दररोज ८०० मेट्रिक ऑक्सिजन तयार केलाजात आहे. शुक्रवारी सेलकडून ११५० तर शनिवारी ९६० लिक्विड मेट्रिक टन आॅक्सिजन विविध राज्यांना पाठविला गेला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App