कोच ग्रँहम रीड यांनी उलगडले यशाचे रहस्य; भारतीय हॉकी टीमची सर्वोत्तम विजिगीषू वृत्तीच त्यांना ऑलिंपिक सुवर्णपदकापर्यंत खेचून नेईल!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतीय हॉकी टीममध्ये पराभवानंतर देखील खचून जाण्याची प्रवृत्ती नाही तर वर उसळून येण्याची प्रवृत्ती आहे. या हॉकी टीमची क्षमता प्रचंड आहे. त्यांची विजिगिषु वृत्तीच त्यांना सुवर्णपदकापर्यंत खेचून नेऊ शकेल, असा आत्मविश्वास भारतीय पुरुष हॉकी टीमचे कोच ग्रँहम रीड यांनी व्यक्त केला आहे.The secret of success unveiled by coach Graham Reed; Only the best attitude of the Indian hockey team will pull them to the Olympic gold medal !!

भारतीय हॉकी टीमच्या वैशिष्ट्यांबद्दल त्यांनी सविस्तर चर्चा केली आहे. ज्यावेळी तुमचे सतत पराभव होत असतात किंवा तुम्हाला पिछाडीवर राहावे लागते त्यावेळी खचून न जाता एकेक पायरी पुढे सरकणे हे सर्वात महत्त्वाचे असते. सध्याच्या भारतीय टीममध्ये ते वैशिष्ट्य खच्चून भरले आहे. पराभवाने ही टीम खचत नाही, तर उसळून वर येते. आपल्या खेळाची प्रमाणबद्धता आणि अचूकता गमावत नाही. तर ती अधिकाधिक कमावत राहते. कोणत्याही टीमकडे अशी विजिगीषू वृत्ती सापडणे अवघड असते. ही विजिगिषु वृत्ती म्हणजे पराभवातून विजय साकारण्याची वृत्ती भारतीय टीममध्ये आहे. ही वृत्ती त्यांना ऑलिंपिक सुवर्णपदकापर्यंत घेऊन जाईल, असा विश्वास देखील ग्रँहम रीड यांनी व्यक्त केला आहे.



ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय टीम निराश झाली नाही. त्यांनी सरावात खंड पाडला नाही. नवीन डाव कसे रचता येतील तसेच आपल्या चुका कशा सुधारता येतील?, यावर टीमने लक्ष केंद्रित केले आणि त्यातून ब्राँझ पदकाच्या लढतीत भारतीय टीमने उत्तम खेळ केला, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

दरम्यान, राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नामांतर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करणे हा निर्णय योग्यच असल्याचे मत ऑलिंपिक ब्रॉंझपदक विजेता भारतीय हॉकी टीमचा कर्णधार मनप्रीत सिंग यांनी व्यक्त केले आहे.

हॉकीमध्ये भारताने माझ्या जन्माच्या आधी शेवटचे पदक मिळवले होते. तब्बल 41 वर्षांनंतर आम्ही भारतासाठी ऑलिंपिक पदक मिळवू शकलो. समस्त भारतीयांच्या सदिच्छा यासाठी आमच्या पाठीशी होत्या. मोठ्यांच्या आशीर्वादाने, कोचच्या मार्गदर्शनाने आणि आमच्या मेहनतीने हे स्वप्न साकार झाले. या विषयी मनप्रीतने समाधान व्यक्त केले.

गेल्या चार-पाच वर्षांमध्ये भारतीय हॉकी खेळाडूंनी प्रचंड मेहनत घेतली. त्यांच्या मेहनतीत सातत्य आणि अचूकता होती, असे प्रतिपादन भारतीय हॉकीचे कोच जॉन रीड यांनी व्यक्त केले आहे. भारतीय हॉकीपटूंच्या आत्मविश्वास ऑलिंपिक खेळताना प्रत्येक सामन्यागणिक दुणावत होता. हाच आत्मविश्वास कायम ठेवल्यावर भारताला ऑलिंपिक सुवर्णपदक मिळवणे शक्य आहे, असा विश्वास ग्रँहम रीड यांनी व्यक्त केला आहे.

त्याच वेळी मनप्रीतनेही राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नामांतर भारताचे महान आणि सुपरस्टार हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या नावाने करण्याचे देखील समर्थन केले. मेजर ध्यानचंद हे करोडो भारतीयांसाठी आणि क्रीडापटूंसाठी सर्वात मोठे प्रेरणास्थान आहेत. त्यांनी भारताला ऑलिंपिक मधले सुवर्णयुग दाखविले होते, अशा भावना मनप्रीत सिंग याने व्यक्त केल्या. एकीकडे मनप्रीत सिंग आणि काही खेळाडू तसेच गेल्या ऑलिंपिकमध्ये ब्राँझ पदक मिळवलेला मल्ल योगेश्वर दत्त यांनी खेलरत्न पुरस्काराच्या नामांतरावर अनुकूल मत मत व्यक्त केले आहे.

त्याच वेळी ऑलिम्पिक पदक विजेता बॉक्सर विजेंदर सिंग याने मात्र त्यावर टीका केली आहे. सर्वकाही मोदींच्या प्रतिमावर्धनासाठी सुरू आहे, असे ट्विट विजेंदर सिंग याने केले आहे. अर्थात विजेंदर सिंग याने दिल्लीची विधानसभा निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढविली होती. सध्या तो काँग्रेस सदस्य आहे. त्यामुळे त्याने काँग्रेसच्या धोरणानुसार राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराच्या नामांतरावर टीका करणे स्वाभाविक आहे.

The secret of success unveiled by coach Graham Reed; Only the best attitude of the Indian hockey team will pull them to the Olympic gold !!

महत्त्वाच्या बातम्या

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात