कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरूवात झाल्यापासून लोकांचा पैशांच्या रोकडवरील विश्वास वाढला आहे. रिझर्व्ह बॅँकेने दिलेल्या आकडेवारीनुसार लोकांनी जास्तीत जास्त रोकड आपल्याजवळ ठेवण्यास प्राधान्य द्यायला सुरूवात केली आहे. सध्या भारतीयांकडे ५२,९२८ कोटी रुपयांची रोकड आहे.The second wave of corona boosted people’s confidence in cash
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरूवात झाल्यापासून लोकांचा पैशांच्या रोकडवरील विश्वास वाढला आहे. रिझर्व्ह बॅँकेने दिलेल्या आकडेवारीनुसार लोकांनी जास्तीत जास्त रोकड आपल्याजवळ ठेवण्यास प्राधान्य द्यायला सुरूवात केली आहे. सध्या भारतीयांकडे ५२,९२८ कोटी रुपयांची रोकड आहे.
९ एप्रिल रोजी लोकांकडे ३०, १९१ कोटी रुपयांची रोकड होती. मात्र, कोरोनाच्या दुसºया लाटेत रुग्णांची संख्या वाढू लागल्यावर त्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. लोकांना देशपातळीवर लॉकडाऊन लागण्याची भीती वाटत आहे. त्यामुळे घाबरून जाऊन त्यांनी बॅँकेतील पैसे काढण्यास सुरूवात केली आहे.
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेक राज्यांनी लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध लावले आहेत. मात्र, देशपातळीवर रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे केंद्र किंवा राज्य सरकारकडून लॉकडाऊन लावण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
त्यामुळे लोकांनी बॅँकेतील पैसे काढून घेण्यास सुरूवात केली आहे.काही ठिकाणी कर्फ्यू लागू असल्याने आणि काही ठिकाणी लागू होण्याची शक्यता असल्याने लोक स्वत:कडे रोकड ठेवण्यास प्राधान्य देऊ लागले आहेत. या पैशातून आपल्याला आवश्यक वस्तूंची खरेदी करणे सोपे होईल, असे लोकांना वाटत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App