नाशिक : संघावर बंदी घालायला पाहिजे, पण काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांचे मत “वैयक्तिक” का आणि कसे??, असा सवाल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या एका जाहीर वक्तव्यामुळे पुढे आला. Mallikarjun Kharge
सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती केंद्रातल्या मोदी सरकारने मोठ्या प्रमाणात साजरी केल्यानंतर काँग्रेस आणि बाकीच्या विरोधी पक्षांना वल्लभभाईंचे महत्त्व पटले आणि त्यांनी वल्लभभाईंच्या selective मतांचे प्रदर्शन केले. यात वल्लभभाईंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर लादलेली बंदी हा विषय सगळ्यांनी चर्चेला आणला.
वल्लभभाई पटेल यांनी संघावर बंदी घातली होती. तसाच लोहपुरुष आता पुन्हा पैदा झाला पाहिजे आणि त्याने संघावर बंदी घातली पाहिजे, असे वक्तव्य समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केले. त्या संदर्भात दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना सवाल केला. त्यावेळी त्यांच्या शेजारी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते जयराम रमेश सुद्धा बसले होते.
कर्जाच्या डोंगराखाली खचलेल्या शेतकऱ्यांना झुलवत न ठेवता तात्काळ कर्जमुक्त करण्याचे पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन! pic.twitter.com/ftdl6DbVxi — ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 31, 2025
कर्जाच्या डोंगराखाली खचलेल्या शेतकऱ्यांना झुलवत न ठेवता तात्काळ कर्जमुक्त करण्याचे पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन! pic.twitter.com/ftdl6DbVxi
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 31, 2025
– खर्गेंचे वैयक्तिक मत
पत्रकारांच्या सवाला उत्तर देताना मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपले “वैयक्तिक” मत असे आहे की संघावर बंदी आणली पाहिजे, हे मी खुलेपणाने सांगतो, असे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे जर खऱ्या अर्थाने सरदार वल्लभभाई पटेल यांना मानत असतील तर त्यांच्या विचारांच्या नुसार या दोघांनी संघावर बंदी आणली पाहिजे कारण आज देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेसह ज्या समस्या उद्भवल्यात, त्या सगळ्यांना संघ आणि भाजप जबाबदार आहे, असे मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.
– मतभेद आणि विसंगती
वास्तविक मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. अर्थातच त्या पत्रकार परिषदेत “वैयक्तिक” मत व्यक्त करणे हा मुख्य विषयच नव्हता. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष विविध महत्त्वाच्या विषयांवर काँग्रेसच्या वतीने मुख्य भूमिका कोणती मांडतात आणि कशा भाषेत मांडतात??, याला महत्त्व होते आणि आहे. पण मल्लिकार्जुन खर्गे यांनी संघावरच्या बंदीचे समर्थन करताना ते काँग्रेसच्या वतीने मत व्यक्त करायचे टाळले. त्या उलट माझे “वैयक्तिक” मत असे आहे की संघावर बंदी आणली पाहिजे, असे ते जाहीरपणे म्हणाले. यातूनच काँग्रेसचे पक्ष म्हणून असलेले मत आणि मल्लिकार्जुन खर्गे यांचे वैयक्तिक मत यांच्यातले मतभेद आणि द्वैत खर्गे यांनी स्वतःहून समोर आणले. पत्रकारांनी या विसंगतीवर बोट ठेवत त्यांना पुढचा प्रश्न विचारला नाही. आपल्याला जे उत्तर द्यायचे होते ते देऊन पत्रकारांना थँक्यू म्हणून खर्गे तिथून निघून गेले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App