द प्राईम मिनिस्टर ऑफ भारत नरेंद्र मोदी आज आसियान बैठकीसाठी इंडोनेशियात!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया नव्हे, तर द प्राईम मिनिस्टर ऑफ भारत नरेंद्र मोदी आज ता. 7 सप्टेंबर 2023 रोजी आशियान देशांच्या बैठकीसाठी इंडोनेशियामध्ये दाखल झाले आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दीड दिवसांचा दौरा असणार आहे. The Prime Minister of India Narendra Modi in Indonesia today for the ASEAN meeting

आसियान देश आणि भारत यांचे 20 वे शिखर संमेलन इंडोनेशियात होणार आहे. त्याचबरोबर 18 वी इस्ट एशियन समिट देखील त्याचवेळी होणार आहे. या दोन्ही बैठकांसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जकार्ता मध्ये दाखल झाले आहेत.

जी 20 च्या अधिकृत निमंत्रण पत्रिकेवर “द प्रेसिडेंट ऑफ भारत” असे प्रसिद्ध केल्यानंतर काँग्रेस सह इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांनी मोदी सरकारवर आगपाखड केली. पण त्याचा कोणताही मोदी सरकारवर परिणाम झाला नाही. उलट द प्रेसिडेंट ऑफ भारत पाठोपाठ द प्राईम मिनिस्टर ऑफ भारत असेच अधिकृत सरकारी कार्यक्रम पत्रिकेवर छापलेले दिसत आहे.

g20 परिषदेच्या सर्व भारतीय अधिकाऱ्यांच्या ओळखपत्रांवर इंडिया नव्हे, तर भारत हा शब्द छापला जाणार असल्याची माहिती आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 आणि 25 ऑगस्ट या काळात दक्षिण आफ्रिका आणि ग्रीसला गेले होते. त्या दौऱ्यात देखील नरेंद्र मोदींचा उल्लेख द प्राईम मिनिस्टर भारत असाच केला होता. पण त्यावेळी फार मोठा बवाल झाला नव्हता पण द प्रेसिडेंट ऑफ भारत आणि द प्राईम मिनिस्टर ऑफ भारत अशा उल्लेखानंतर मात्र काँग्रेस सह इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांनी आगपाखड केली आहे. पण त्याचा मोदी सरकारवर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही.

The Prime Minister of India Narendra Modi in Indonesia today for the ASEAN meeting

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात