सैन्यभरती साठी रोज रात्री ‘त्याचा’ धावण्याचा सराव ; पर्वतीय भागातील तरुणाईच्या संघर्षाचे चित्र

विशेष प्रतिनिधी

डेहराडून : पर्वतीय भागात तरूणाईला थांबवण्याची आणि इथले पाणी अडवण्याची चर्चा अनेक मंचांवर होते. तरीही डोंगराळ भागातील तरुणाईच्या संघर्षाचे चित्र अधूनमधून समोर येते. पोटाची भूक जाणवते. चित्रपट निर्माते विनोद कापडी यांनी एका फेसबुक पोस्टवर अल्मोडा येथील प्रदीप मेहरा या कोवळ्या तरुणाचा संघर्ष शेअर केला आहे. The practice of running ‘his’ every night for recruitment

१९ वर्षीय प्रदीप मेहरा रात्री १२ वाजता नोएडाला जाणार्‍या रस्त्याने खांद्यावर जड बॅग घेऊन एकटाच पळत होता. कारने जाणाऱ्या विनोद कापडी यांनी त्याला वारंवार लिफ्टची ऑफर दिली पण त्याने नकार दिला. प्रदीपने सांगितले की, तो एका कारखान्यात काम करतो. सैन्यात भरती होण्यासाठी धावण्याची प्रॅक्टिस करत असतो. त्याला सकाळी आठ वाजता कारखान्यात जावे लागते त्यामुळे सकाळी धावता येत नाही.



तो रोज दहा किमी धावतो. हा त्याचा दिनक्रम आहे. विनोद कापडी यांनी त्याला अनेकदा कारमधून सोडण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न केला. प्रदीप याने साफ नकार दिला.
रात्री कामावरून घरी जाणे हीच त्याची धावण्याची वेळ आहे. त्यानंतरच तो खोलीत जाऊन स्वयंपाक करतो. येथे तो आपल्या मोठ्या भावासोबत राहतो. भावाची नाईट ड्युटी असते. गावात आई आजारी आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत.

हरीश रावत यांनीही ट्विट केले

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनीही यश मिळवण्यासाठी धैर्य असणे आवश्यक आहे, असे म्हणत प्रदीप याचा व्हिडिओ शेअर केला आहे. मला प्रदीपमध्ये धैर्य, उत्कटता, सकारात्मक विचार, आत्मविश्वास दिसतो. प्रदीप, असेच लढत राहा. तुम्हाला यश नक्कीच मिळेल, असे त्यात म्हटले आहे.

The practice of running ‘his’ every night for recruitment

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात