नाशिक : जिथे भाजपला कुणी नव्हते विचारत; तिथे पक्षाला आणि NDA ला उमेदवार मिळाले 21 हजार 65!!, हा राजकीय चमत्कार केरळ मध्ये दिसून आला. महाराष्ट्रात जशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत, तशाच त्या केरळमध्ये सुद्धा सुरू आहेत. केरळमध्ये आत्तापर्यंत कम्युनिस्टांची डावी आघाडी आणि काँग्रेस प्रणित संयुक्त आघाडी यांचीच लढत यत्र तत्र सर्वत्र व्हायची. तिथे भाजपला कुणीही विचारत नव्हते. पण आज त्याच केरळमध्ये मोठा राजकीय चमत्कार घडून भाजपच्या कमळ चिन्हावर आणि NDA घटक पक्षांच्या चिन्हांवर 100 – 150 नव्हे, किंवा 1000 – 2000 नव्हे, तर तब्बल 21,065 उमेदवार स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवत आहेत. भाजप प्रणित NDA ने केरळमध्ये मोठे आव्हान उभे केले आहे.
केरळमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये डाव्यांच्या कम्युनिस्ट आघाडीसमोर काँग्रेस प्रणित संयुक्त विकास आघाडीचेच नव्हे, तर आता भाजपचेही प्रमुख आव्हान उभे राहिले आहे. विशेष म्हणजे कम्युनिस्टांची डावी आघाडी आणि काँग्रेसची संयुक्त आघाडी या दोन्ही आघाड्या स्वतःच्या चिन्हांवर निवडणुका लढवत नसून त्या वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणुका लढवत असल्यामुळे त्यांची political identity लपून राहिली आहे. त्याउलट भाजप आणि घटक पक्षांचे कार्यकर्ते मात्र कमळ आणि अन्य चिन्हांवर निवडणूक लढवत असल्यामुळे भाजपची political identity केरळ सारख्या “राजकीय दुष्काळी राज्यात” ठळक होत चालली आहे.
केरळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी इंटरेस्टिंग आकडेवारी आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केली आहे. केरळ मध्ये कसा राजकीय बदल घडलाय आणि आत्तापर्यंत केवळ दुरंगी राहिलेली राजकीय लढत आता कशी तिरंगी बनली आहे याचीच चुणूक दाखवली आहे.
– आकडे बोलतात
केरळ मधल्या जिल्हा परिषदांमध्ये 99.6 % जागांवर भाजपने आणि मित्र पक्षांनी कमळ चिन्हावर, तसेच अन्य चिन्हांवर उमेदवार उभे केले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर उमेदवार तर सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीला सुद्धा मिळालेले नाहीत. काँग्रेसला सुद्धा तेवढे उमेदवार मिळायचा प्रश्नच उद्भवलेला नाही. केरळमध्ये पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप आणि मित्र पक्षांनी 93 % जागांवर उमेदवार उभे केले आहेत, तर शहरी भागातल्या 99 % जागांवर भाजप आणि मित्र पक्षांना तगडे उमेदवार मिळाले आहेत.
– दुरंगी नव्हे, आता तिरंगी निवडणूक
याचा अर्थ असा की केरळ मधली निवडणूक आता केवळ दुरंगी उरलेली नाही, तर त्यात भाजपचा रंगही आता ठळक होत जाऊन ते तिरंगी बनली आहे. केरळमध्ये कम्युनिस्टांच्या बालेकिल्ल्यात आत्तापर्यंत भाजपला उमेदवार मिळत नव्हते. भाजपला कुणी मित्रही मिळत नव्हते. कमळ चिन्हावर कोणी उमेदवार उभे राहिले, तर त्यांना डाव्या पक्षांच्या हिंसाचाराला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे कमळ चिन्हावर किंवा अन्य चिन्हांवर उभे राहण्याची कुणी हिंमतच करत नव्हते. पण तिथे संघाचे संघटन वाढले. त्याचबरोबर डाव्या पक्षांच्या विरोधात उजव्या पक्षांची संघटना टप्प्याटप्प्याने मजबूत व्हायला लागली. जिहाद विरोधात वातावरण तयार व्हायला लागले. त्यामुळे भाजप आणि मित्र पक्षांना तिथे निवडणूक लढवायचे धाडस दाखविणारे 21,065 उमेदवार मिळाले. केरळ मधले राजकीय वातावरण फिरल्याचेच ते लक्षण ठरले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App