ग्रेटर नोएडा येथील आयटीबीपी रेफरल हॉस्पीटलमध्ये इटलीच्या पथकाने अवघ्या ४८ तासांत ऑक्सिजन प्लँट उभारला आहे. या प्लॅटंमधून १०० रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकणार आहे. इंडो तिबेयन बॉर्डर पोलीसांकडून हे रुग्णालय चालविले जाते.The Oxygen Plant, built in just 48 hours, was visited by a team from Italy
विशेष प्रतिनिधी
ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडा येथील आयटीबीपी रेफरल हॉस्पीटलमध्ये इटलीच्या पथकाने अवघ्या ४८ तासांत ऑक्सिजन प्लँट उभारला आहे. या प्लॅटंमधून १०० रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकणार आहे. इंडो तिबेयन बॉर्डर पोलीसांकडून हे रुग्णालय चालविले जाते.
इटलीचे भारतातील राजदूत व्हिन्सेंदो द लुका यांनी या प्लॅँटचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, अवघ्या ४८ तासांत आम्ही हा प्लॅँट उभारण्यात यशस्वी झालो आहोत. येथील ऑक्सिजन निर्मिती सुरू झाली आहे. भारत आणि इटलीच्या एकत्रित सामर्थ्याचे हे प्रतिक आहे. भारत-इटली मैत्री यामुळे आणखी मजबूत होणार आहे.
दिल्ली आणि लगतच्या भागात सध्या ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. दिल्लीतील काही रुग्णालयांमध्ये तर आॅक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नोएडा येथील रुग्णालयांत तातडीने ऑक्सिजन प्लॅँट उभारण्याचे आदेश दिले होते.
इटलीने या रुग्णालयासाठी ऑक्सिजन तयार करणारे मशीन भेट दिले आहे. खास विमानाने हे मशीन नोएडा येथे आणण्यात आले. या रुग्णालयात पोलीस आणि त्यांच्या कुटुंबांवर उपचार केले जातात.
इटलीतील सुमारे १७ पर्यटकांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यावेळी त्यांना आयटीबीपी या रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यामुळे इटलीने या रुग्णालयात आपला पहिला प्लॅँट देण्याचा निर्णय घेतला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App