विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारत हा तरूणांचा देश म्हणून ओळखला जातो. त्याप्रमाणे देशातील तरुणांची संख्या वाढली आहे. मात्र, देशातील १५ वषार्खालील मुलांची संख्या घटत चालल्याचे समोर आले आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत भारत म्हातारा होण्याची भीती आहे.The number of young people is increasing but the number of children is decreasing. In a few years, India will become old
१९७१ साली भारताच्या एकूण लोकसंख्येच्या ४१.२ टक्के १५ वयोगटातील मुले होती. ती २०१९ मध्ये घटून २५.३ टक्के झाली आहे १९७१ त्या तुलनेत १५.९ टक्क्यांनी घट झाल्याचे समोर आले आहे. या कालावधीत १५ ते ५९ वयोगटातील लोकसंख्येची टक्केवारी वाढली आहे.
या १९७१ साली वयोगटातील ५३.४ टक्के लोकसंख्या होती. जी २०१९ मध्ये वाढून ६६.७ टक्के इतकी झाली आहे. त्याचबरोबर वृद्धांचा म्हणजेच ६० वर्षांवरील लोकांची संख्या ही वाढली आहे. एकूण लोकसंख्येतील वृद्धांचा वाटा १९७१ मधील ५.३ टक्क्यांवर होता तो सध्या ८ टक्क्यांवर पोहोचला आहे.
बिहार, मध्य प्रदेश आणि झारखंड ही देशातील सर्वात तरुण राज्ये आहेत. २०१९ मध्ये, झारखंड आणि मध्य प्रदेशातील ३३.५ टक्के आणि २९.१ टक्के लोकसंख्या ही १५ वर्षांपेक्षा कमी वयाची संख्या असलेली मुले आहेत. आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि पंजाबमध्ये ही लोकसंख्या सर्वात कमी आहे.केरळ आणि तामिळनाडूमध्ये अनुक्रमे १२.९ टक्के आणि ११.३ टक्के वयस्कर व्यक्तींची संख्या सर्वाधिक आहे.
तर तेलंगणातील लोकसंख्येच्या ७१.९ टक्के वर्ग हा कार्यरत आहे.केंद्र सरकार मुलींच्या लग्नाचे वय १८ वरून २१ वर्षे करण्यासाठी कायदा आणणार आहे. मात्र, २१ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींच्या लग्नाचे प्रमाण घटत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. २१ वर्षांखालील सर्वाधिक मुलींचे लग्न झालेल्या राज्यांच्या यादीत पश्चिम बंगाल पहिल्या स्थानी आहे.
2019 मध्ये पहिल्यांदाच माता झालेल्या महिलांनी निम्म्याहून अधिक मुलांना जन्म दिला. २०१९ मध्ये, ५१.९ टक्के मातांनी बाळांना जन्म दिला, याचबरोबर २०१९ मध्ये जन्मलेल्या बाळांपैकी ११.७ टक्के अपत्ये त्यांच्या आईचे तिसरे अपत्य होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App