
वृत्तसंस्था
चंडीगड – ममता बॅनर्जींचे हाय प्रोफाइल निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा बंगालमधला “रोल” संपत आला असतानाच त्यांना आधीच मिळालेला “नवा रोल” राजकीय वादात सापडला आहे… तो पंजाबमध्ये. The new role of prashant kishor encircled in a fix in punjab
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी प्रशांत किशोर यांना आपले “विशेष प्रमुख सल्लागार” नेमले आहे. त्यावरूनच वाद सुरू झाला आहे आणि तो देखील सत्ताधारी काँग्रेस पक्षात. प्रशांत किशोर यांचा तिकीट वाटपात हस्तक्षेप सहन करणार नाही, असे फिलर्स पंजाबच्या अनेक काँग्रेस नेत्यांनी अमरिंदर सिंग यांना दिले. शेवटी दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांना त्या बद्दल खुलासा करावा लागला आहे.
प्रशांत किशोर यांचा रोल मुख्यमंत्री कार्यालयात प्रमुख सल्लागारापुरता मर्यादित आहे. त्यांचा तिकीट वाटपाशी आणि निर्णय प्रक्रियेशी काहीही संबंध नाही, असे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग स्पष्ट केल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातून सांगण्यात आले.
पण एकूणच प्रशांत किशोर यांच्या नियुक्तीच्या मामल्यात मुख्यमंत्र्यांना खुलासा करावा लागला, यातूनच पंजाब काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आल्याचे स्पष्ट होत आहे. पंजाबमध्ये माजी मुख्यमंत्री राजिंदर कौर भट्टल गटाचा अमरिंद सिंग यांना विरोध आहे. याखेरीज जिल्हा पातळीवरचे अनेक नेते त्यांच्या विरोधात आहेत. पंजाबच्या निवडणूकीत प्रशांत किशोर यांच्या माध्यमातून अमरिंदर सिंग तिकीट वाटपात मोठी खेळी करून आपल्या विरोधी गटांना नेस्तनाबूत करू शकतात, याचा अंदाज अनेक नेत्यांना आला आहे. त्यामुळेच प्रशांत किशोर यांनी नव्या रोलमध्ये काम करायला सुरूवात करण्यापूर्वीच पंजाब काँग्रेसमधील विविध गटांनी त्यांना विरोध केला आहे.
His (Kishor’s) role as my principal advisor is limited. It is only advisory in nature, with no decision-making authority vested in him: Punjab Chief Minister Captain Amarinder Singh as quoted by CMO.
— ANI (@ANI) April 13, 2021
त्यामुळे बंगालपाठोपाठ प्रशांत किशोर यांनी नवा रोल पंजाबमध्ये स्वीकारला तरी त्यांच्यापुढे आव्हानांचा बंगालइतकाच मोठा डोंगर असणार आहे.