विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुस्लीम शाखेने कर्नाटकच्या बीबी मुस्कान खान या मुलीचं समर्थन केले आहे. हिजाब अथवा पडदा हा भारतीय संस्कृतीचा भाग आहे, असे म्हणत हिजाब परिधान करण्यासाठी मुस्कानच्या याचिकेचे समर्थन केले आहे.The Muslim wing of the RSS said the support for the hijab was part of Indian culture
मुस्लीम राष्ट्रीय मंचाचे प्रांत संचालक अनिल सिंह म्हणाले की, मुस्कान आमच्या समुदायातील एक मुलगी आणि बहीण आहे. संकटाच्या काळात आम्ही तिच्यासोबत उभे आहोत. हिंदू संस्कृती महिलांचा सन्मान करणं शिकवते. ज्यांनी जय श्रीरामचे नारे लावून मुलीवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला ते चुकीचे आहे.
हिजाब परिधान करणे हा त्या मुलीचा वैयक्तिक अधिकार आहे. जर तिने कॅम्पसमध्ये ड्रेस कोडचं उल्लंघन केले असेल तर संस्थेला तिच्याविरोधात कारवाई करण्याचा अधिकार आहे. मुलांनी भगवी शाल अंगावर ओढून जय श्रीरामचे नारे देणे हे कृत्य हिंदू संस्कृतीला बदनाम करणारं आहे. हिंदू महिला त्यांच्या आवडीनं पदर चेहऱ्यावर घेतात. हिजाब वा पदर हे भारतीय संस्कृतीचा भाग आहे.
सरसंघचालकांनी म्हटलंय मुस्लीम आमचे भाऊ आहेत. दोन्ही समुदायाचे डीएनए समान आहेत. मी हिंदू समुदायातील सदस्यांना मुस्लिमांना भावाच्या रुपात स्वीकारण्याचं आवाहन करतो असंही अनिल सिंह यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App