संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओच्या) परिश्रमांना आणखी एक यश आले आहे. सोमवारी संध्याकाळी साडेचार वाजता ओडिशातील चांदीपूर येथून झेपावलेल्या क्षेपणास्त्राने मानवरहित हवाई लक्ष्याचा अचूक भेद करत ते नष्ट केले. या यशामुळे भारताच्या हवाई ताकदीमध्ये जबरदस्त वाढ झाली आहे. सीमेवरील शत्रुंना हा जोरदार इशारा मानला जात आहे. The modified ground system of the existing ‘Akash’ weapon system successfully completed its trial. Its new threatening weapon in the armory of India.
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : ‘आकाश प्राइम’ या क्षेपणास्त्राने त्याच्या पहिल्याच उड्डाण चाचणीमध्ये शत्रूच्या विमानाची नक्कल असणाऱ्या मानवरहित हवाई लक्ष्याचा अचूक भेद करत ते नष्ट केले. या यशामुळे भारताच्या क्षेपणास्त्र शस्त्रागाराची भेदकता वाढली असून देशाचे हवाई संरक्षण आणखी मजबूत झाले आहे. आकाश प्राईमच्या यशस्वीतेमुळे चीनची डोकेदुखीही वाढली आहे. कारण गेल्या वर्षी भारत आणि चीन यांच्यात गलवान खोऱ्यात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर भारतीय लष्कराने लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आकाश हवाई संरक्षण यंत्रणा तैनात केली आहे.
डीआरडीओने सोमवारी दुपारी ओडिशाच्या चांदीपूर येथे आकाश क्षेपणास्त्राच्या नवीन आवृत्तीची चाचणी यशस्वी केली. भारतीय हवाई दलाने ग्वाल्हेर (महाराजपूर एएफएस), जलपायीगुडी (हसीमारा एएफएस), तेजपूर, जोरहाट आणि पुणे (लोहेगाव एएफएस) येथील तळांवर आकाश प्राईम तैनात केले आहे. या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी डीआरडीओ, भारतीय सैन्यदल भारतीय वायूदल आणि अन्य संबंधित संशोधकांचे अभिनंदन केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App