विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद : पेट्रोल पंपावर गैरप्रकाराच्या तक्रारी होत असल्याने सामान्य नागरिकाप्रमाणे डिझेल घेण्यासाठी पोहोचले. मात्र, त्यांनाच बारा मिलीलिटर डिझेल कमी देण्यात आली. मंत्र्यांनी रंगे हात पकडून या पेट्रोल पंपावर कारवाई केली.The minister of Gujarat arrived in the guise of an ordinary citizen and was given 12 ml less diesel
गुजरातचे मंत्री मुकेश पटेल यांनी सर्वसामान्यांमध्ये डिझेल भरण्यासाठी पंपावरील लाइनवर नंबर लावला. मात्र त्यांनी यावेळी हातचलाखीने लोकांची फसवणूक करणाºया पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला रंगेहाथ चोरी करुन जनतेला फसवताना पकडले आहे.
सुरतच्या जहांगीरपुरा परिसरामध्ये यश पेट्रोल पंप येथे पेट्रोलची चोरी केला जात असल्याची माहिती मुकेश पटेल यांना मिळाली होती. त्यानंतर ते स्वत: या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोहचले. मात्र संपूर्ण लवाजमा न घेऊन जाता ते सामान्य नागरिकाप्रमाणे गेले आणि त्यांना तेथील सत्य समजलं. त्यांनी पेट्रोल पंप सील करण्याचे आदेश देत तपास करण्यास सांगितले आहे.
हा पेट्रोल पंप नुकताच सुरु झाला होता. त्यानंतर या पेट्रोल पंपासंदर्भात अनेक तक्रारी आल्या होत्या. दाखवण्यात येणाऱ्या प्रमाणापेक्षा प्रत्यक्षात पेट्रोल-डिझेल कमी देण्याची तक्रार अनेकांनी केलेली. या तक्रारींबद्दल जाणून घेण्यासाठी मुकेश पटेल स्वत: गाडी चालवत पंपावर गेले आणि गाडीमध्ये डिझेल टाकण्यास सांगितलं. मात्र सांगितलेल्या प्रमाणापेक्षा कमी डिझेल टाकल्याची शंका आल्याने पटेल यांनी पंपाच्या संचालकांना बोलावले. त्यांच्याकडून स्कॉट मेन्टेन्सची नोंद वही मागवून घेतली.
मात्र रोज पंपावरील किती इंधन संपलं, किती उरलं यासंदभार्तील माहिती लिहिणं अपेक्षित असलेल्या या वहीत मागील तीन चार दिवसांपैकी एकाही दिवसाची नोंद नव्हती. पेट्रोल पंपाच्या संचालकांचा हा बेजबाबदारपणा पाहून पटेल यांनी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना पेट्रोल पंपावर बोलवून घेतले. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने स्थानिक प्रशासनाने अधिकारी आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना पंपावर पाठवून देत तपास सुरु केला. प्राथमिक तपासामध्ये इंधन जिथून टाकीमध्ये पडतं ते नोजल चुकीच्या पद्धतीने बसवण्यात आल्याने कमी इंधन दिलं जात असल्याचं स्पष्ट झालं.
मुकेश पटेल म्हणाले, पेट्रोलवरील अधिभार कमी झाल्यानंतर अनेक पेट्रोल पंपचे मालक फसवणूक करत असल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या. माझ्या घरापासून जवळच एक पंप आहे. मात्र एक दुसरी खासगी कार घेऊन मी दुसऱ्या पंपावर सत्यता पडताळून पाहण्यासाठी गेलो तर तिथे फसवणूक केली जात असल्याचे माझ्या लक्षात आलं. कर्मचाऱ्याने १२ मिली लीटर पेट्रोल कमी भरलं होतं. मी त्या पंपावरील इंधनही लॅब टेस्टसाठी पाठवण्याचे आदेश दिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App