वृत्तसंस्था
चेन्नई : ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटावरून देशात वाद सुरूच आहे. दरम्यान, तामिळनाडूमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. चित्रपटगृहांच्या मालकांनी कायदा आणि सुव्यवस्थेची भीती आणि चित्रपटाला मिळालेला कमी प्रतिसाद यामुळे चित्रपट स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘The Kerala Story’ will not be screened in Tamil Nadu, multiplex association’s decision cited for law and order
सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट 5 मे रोजी प्रदर्शित झाला. ट्रेलर रिलीज होताच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. ट्रेलरमध्ये दावा करण्यात आला आहे की, राज्यातील 32,000 मुली बेपत्ता झाल्या आहेत आणि नंतर त्या दहशतवादी गट ISIS मध्ये सामील झाल्या आहेत.
चित्रपटामुळे कायदा आणि सुव्यवस्थेला धोका : मल्टीप्लेक्स असोसिएशन
तमिळनाडू मल्टिप्लेक्स असोसिएशनने सांगितले की रविवारपासून राज्यभर ‘द केरला स्टोरी’चे कोणतेही स्क्रीनिंग होणार नाही. हा चित्रपट कायदा आणि सुव्यवस्थेसाठी धोकादायक ठरू शकतो, असे असोसिएशनने म्हटले आहे. या चित्रपटाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत नसल्याचा दावाही त्यांनी केला.
हा चित्रपट प्रदर्शित होताच इस्लामिक संघटनांनी त्याचा निषेध केला. तमिळनाडू मुस्लिम मुन्नेत्र कळघमने कोईम्बतूर येथील एका मॉलमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाविरोधात धरणे आंदोलन केले. दरम्यान, त्यांची पोलिसांशी बाचाबाचीही झाली.
छत्तीसगडमध्येही लव्ह जिहादच्या अनेक घटना : भाजप खासदार सरोज पांडे
केरळसारख्या अनेक घटना छत्तीसगडमध्ये झाल्याचा दावा भाजप खासदार सरोज पांडे यांनी केला आहे. या सर्व प्रकरणात छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी कारवाई करावी, असे त्या म्हणाल्या. सरोज म्हणाल्या की, सीएम बघेल अवांतर बोलून खरा मुद्दा वळवतात, त्यांनी असे करू नये. यासोबतच त्यांनी ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट छत्तीसगडमध्येही करमुक्त करण्याची मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App