काश्मीरचा प्रश्न दिल्लीतच सुटला पाहिजे, इस्लामाबाद किंवा वॉशिंग्टनमध्ये नव्हे; अपनी पार्टीच्या अल्ताफ बुखारींनी सुनावले

वृत्तसंस्था

श्रीनगर : काश्मीर प्रश्न हा दिल्लीतच सुटला पाहिजे. तो इस्लामाबाद किंवा वॉशिंग्टन – लंडनमध्ये जाऊन सोडविण्याची गरज नाही, असे जम्मू काश्मीरमधल्या अपनी पार्टीचे प्रमुख अल्ताफ बुखारी यांनी पीडीपीच्या नेत्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांना सुनावले आहे.The Kashmir issue should be resolved in Delhi, not in Islamabad or Washington

केंद्रातील मोदी सरकार तालिबानशी वाटाघाटी करते तर पाकिस्तानाशी का चर्चा करीत नाही, असा सवाल मेहबूबा मुफ्ती यांनी केला होता. त्याला अल्ताफ बुखारी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, की काश्मीरच्या विषयात पाकिस्तानला घुसवत राहणे हा कायमच त्यांचा अजेंडा राहिला आहे. पण तो प्रश्न दिल्लीतच सुटला पाहिजे. इस्लामाबादमध्ये नव्हे.



जम्मू – काश्मीर संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ जून रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत काश्मीरमधील सर्व पक्ष सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर अपनी पार्टीची भूमिका अल्ताफ बुखारी यांनी मांडली.

राज्यातल्या जनतेला लोकशाहीचे सगळे अधिकार मिळाले पाहिजेत. महाराष्ट्र आणि आसाममधल्या नागरिकांना जे अधिकार आहेत. तसेच समान अधिकार काश्मीरच्या जनतेला मिळावेत, अशी मागणी सर्वपक्षीय बैठकीत करणार असल्याचे बुखारी यांनी स्पष्ट केले.

अपनी पार्टी काश्मीरच्या राजकाऱणात नवीन असली तरी तिने स्थानिक जिल्हा पंचायतीच्या निवडणूकीत फारूख अब्दुल्लांच्या नॅशनल कॉन्फरन्सला आणि मेहबूबा मुफ्तींच्या पीडीपीला चांगली टक्कर दिली आहे. ५ जिल्हा पंचायतींमध्ये अपनी पार्टीचे नेते अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्या पक्षाच्या अल्ताफ बुखारी यांच्या निवेदनाला राजकीय महत्त्व आहे.

The Kashmir issue should be resolved in Delhi, not in Islamabad or Washington

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात