The Kashmir Files : मूर्ख, वेडे आणि अज्ञानी लोकांना उत्तरे देणे टाळावे; विवेक अग्निहोत्रींचा केजरीवालांना टोला!!


वृत्तसंस्था

भोपाळ : काश्मीर मधल्या 1990 च्या दशकातल्या हिंदू नरसंहाराचे सत्य दाखवणाऱ्या “द काश्मीर फाईल्स” सिनेमाच्या मुद्द्यावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि निर्माते-दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आमने सामने आले आहेत.the Kashmir Files: Avoid giving answers to stupid, crazy and ignorant people

9 राज्यांमध्ये “द काश्मीर फाईल्स” हा सिनेमा टॅक्स फ्री करण्यात आला आहे. अशीच मागणी भाजपच्या आमदारांनी दिल्ली विधानसभेत केली. या मागणीला उत्तर देताना अरविंद केजरीवाल यांनी विवेक अग्निहोत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोमणे मारले.


The Kashmir Files: होय ‘डंके की चोट पे’ आम्ही The Kashmir Files पाहायला गेलो होतो , तुम्हाला काही अडचण आहे का ? देवेंद्र फडणवीस आक्रमक


“द काश्मीर फाईल्स” हा सिनेमा टॅक्स फ्री करण्याची मागणी कशासाठी करता? विवेक अग्निहोत्री यांना सांगा तो युट्युब वर अपलोड करा. म्हणजे सगळ्यांनाच फ्री होऊन जाईल, असा टोमणा केजरीवालांनी मारला.

यासंदर्भात भोपाळ मधल्या माखनलाल चतुर्वेदी पत्रकारिता विद्यापीठात विवेक अग्निहोत्री यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी विवेक अग्निहोत्री म्हणाले, ज्याला सिनेमा समजावून घ्यायचा आहे, तो समजून घेतो. पण आपल्याकडे संस्कृत मुहावरा आहे. मूर्ख, वेडे आणि अज्ञानी लोकांना उत्तरे देण्याच्या फंदात पडू नये. त्यामुळे “द काश्मीर फाईल्स” सिनेमा दिल्लीत टॅक्स फ्री करायचा का नाही या प्रश्नाचे उत्तर मी देत नाही.

the Kashmir Files: Avoid giving answers to stupid, crazy and ignorant people

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात