कर्नाटक निकाल : भाजपमधून काँग्रेसमध्ये मारलेली उडी फसली; माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर पिछाडीवर!!

वृत्तसंस्था

बेंगलुरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालात प्राथमिक कल हाती आले असून कर्नाटकातील 10 महत्त्वाच्या जागांवर देशाचे लक्ष लागलं आहे. या मतदार संघात बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामध्ये सर्वात जास्त प्रतिष्ठेची जागा माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांची हुबळी धारवाड असून ते 6 वेळा या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. मात्र या निवडणुकीत त्यांनी भाजपमधून काँग्रेसमध्ये उडी घेतली, ती उडी फसली असून जगदीश शेट्टर पिछाडीवर आहेत. The jump from BJP to Congress failed; Former Chief Minister Jagdish Shettar is behind

कनकपुरा मतदारसंघात मुख्यमंत्री पदाचे दावेदार कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार कनकापुरा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपने येथे मंत्री आर. अशोक यांना त्यांच्या विरोधात उभे केले आहे. शिवकुमार आघाडीवर आहे.

चन्नापट्टन मतदारसंघात JDS प्रमुख माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी स्वत: या जागेवरुन उमेदवार आहेत. कुमारस्वामी यांच्या विरोधात भाजपने सीपी योगेश्वर यांना तर काँग्रेसने गंगाधर एस. यांना तिकीट दिलं आहे. येथे कुमारस्वामी आघाडीवर आहे.

शिगगाव मतदारसंघातून मुख्यमंत्री बसवराज बोम्मई रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसने यासिर अहमद खान पठाण यांना तिकीट देण्यात आलं आहे. बोम्मई येथे 2008 पासून निवडून येत आहेत. बोम्मई येथे आघाडीवर आहेत.

हुबळी-धारवाड मध्य- कर्नाटकचे दिग्गज लिंगायत नेते माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर भाजप सोडल्यानंतर काँग्रेसच्या तिकीटावर येथून लढत आहेत. ते येथून 6 वेळा आमदार आहेत. या मतदार संघात भाजपने महेश तेंगीनाकाई यांना तिकीट दिलं आहे. पण शेट्टर येथे पिछाडीवर आहे.

चित्तपूरमधून काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांचा मुलगा प्रियांक खरगे येथून निवडणूक लढवत आहे. प्रियांकाच्या विरोधात भाजपच्या मणिकंता राठोड आहेत. प्रियांक आघाडीवर आहे.

अथणीमध्ये माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी हे कर्नाटकातील अथणी मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आहेत. लक्ष्मण सवदी यांनी नुकतेच भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. भाजपने येथून महेश कुमथल्ली यांना उमेदवारी दिली आहे.शसवदी हे आघाडीवर आहेत.

The jump from BJP to Congress failed; Former Chief Minister Jagdish Shettar is behind

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात