ड्रग्ज सिंडिकेटशी संबंधित प्रकरणाची झळ उदयनिधी स्टॅलिनपर्यंत पोहोचली

NCB करू शकते चौकशी; जफर सादिकने उदयनिधी स्टॅलिनला ७ लाख रुपये दिल्याची दिली कबुली


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : टॉलिवूड आणि बॉलिवूड पुन्हा एकदा ड्रग सिंडिकेटशी जोडले गेले आहेत. NCB ने जफर सादिक या तमिळ चित्रपट निर्मात्याला आंतरराष्ट्रीय ड्रग सिंडिकेट चालवल्याबद्दल अटक केली आहे. स्पेशल सेलच्या मदतीने सादिकला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे.The issue related to drugs syndicate reached Udayanidhi Stalin.

चौकशीत त्याचे संबंध भारत-ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडच्या ड्रग्ज कार्टेलशी जोडलेले असल्याचे समोर आले. या ड्रग्ज व्यवसायातून मिळालेला पैसा तो फिल्म मेकिंग, रिअल इस्टेट, हॉटेल्स आणि इतर व्यवसायात गुंतवत होता. गेल्या आठवड्यात या सिंडिकेटशी संबंधित तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीत जफर सादिकची माहिती मिळाली. आता एनसीबी उदयनिधी स्टॅलिनचीही चौकशी करू शकते.



एनसीबीचे डीडीजी ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले की, जफर सादिकने चौकशीदरम्यान उदयनिधी स्टॅलिनला ७ लाख रुपये दिल्याची कबुली दिली आहे. ही रक्कम कोणत्या कारणासाठी देण्यात आली याचा तपास सुरू आहे. ड्रग मनी स्टॅलिनला देण्यात आली होती का, याचाही तपास केला जात आहे. या तपासात कास्टिंग काउचचाही अँगल आहे. मनी लाँड्रिंगचा तपास करण्यासाठी एनसीबी आता ईडीला पत्र लिहित आहे. एनसीबी लवकरच काही बॉलीवूड फिल्म फायनान्सर्सना समन्स पाठवेल आणि त्यांना चौकशीसाठी बोलावेल. मंगाई हा चित्रपट पूर्णपणे ड्रग्जच्या पैशातून बनवण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. उदयनिधी स्टॅलिन यांना दिलेल्या ७ लाख रुपयांपैकी २ लाख रुपये पक्ष निधीसाठी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तर पूर निधीसाठी ५ लाख रुपये देण्यात आले.

एनसीबीच्या रडारवर आल्यानंतर जफर सादिक १५ फेब्रुवारीपासून फरार होता. फरार असताना तो त्रिवेंद्रम-मुंबई-पुणे-हैदराबाद-जयपूर येथे राहत होता. एनसीबीने त्याच्या ताब्यातून ५० किलो स्यूडोफेड्रिल औषध जप्त केले. तो खोबरे आणि सुक्या मेव्याच्या रुपात स्यूडोफेड्रिल न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाला पाठवत असे. सादिक द्रमुक पक्षाचा होता. आत्तापर्यंत जफर सादिकने ऑस्ट्रेलियाला ४५ पार्सल पाठवले आहेत. या औषधाच्या पुरवठ्यासाठी तो प्रतिकिलो एक लाख रुपये घेत असे.

एनसीबीच्या म्हणण्यानुसार, जफर सादिकने आतापर्यंत ३५०० हजार किलो ड्रग्ज पाठवले आहेत, म्हणजेच त्याने सुमारे ४ हजार कोटी रुपयांचा पुरवठा केला आहे. चेन्नईतही त्याचे हॉटेल आहे. २०१९ मध्ये ड्रग्ज तस्करी प्रकरणात त्याचे नाव मुंबई कस्टम्ससमोर आले होते.

The issue related to drugs syndicate reached Udayanidhi Stalin.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात