दोन जणांनी सभागृहात उडी मारल्याच्या घटनेची चौकशी सुरू

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली माहिती, जाणून घ्या आणखी काय म्हणाले 

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : लोकसभेच्या सुरक्षेतील मोठी चूक समोर आली आहे. दोन अज्ञात व्यक्तींनी प्रेक्षक गॅलरीतून उडी मारल्याने गदारोळ झाला आणि सभागृह तहकूब करण्यात आले. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. The incident of two people jumping into the House is being investigated Lok Sabha Speaker Om Birla

संसद सुरक्षेतील मोठ्या त्रुटींबद्दल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले, “दोन जणांनी सभागृहात उडी मारल्याच्या घटनेची चौकशी केली जात आहे, तो सामान्य धूर होता, काळजी करण्यासारखे काही नाही.”

ते पुढे म्हणाले, “सभागृहात उडी मारणाऱ्या दोघांना पकडण्यात आले असून सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे. संसद भवनाबाहेर आंदोलन करणाऱ्या दोघांनाही पकडण्यात आले आहे.”

काही खासदारांचे म्हणणे आहे की ज्या लोकांनी सभागृहात उडी मारली त्यांनी काही फवारले ज्यामुळे गॅस पसरला. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले की, दोघांनी सभागृहात उडी मारली. तर समाजवादी पक्षाचे खासदार एसटी हसन यांनी सांगितले की, दोन जणांनी प्रेक्षक गॅलरीतून लोकसभेच्या सभागृहात उडी मारली आणि त्यांच्या बुटामधून काहीतरी काढले, त्यामुळे गॅस पसरू लागला.

The incident of two people jumping into the House is being investigated Lok Sabha Speaker Om Birla

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात