वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दूर शिक्षण अर्थात डिस्टन्स एज्युकेशन तसेच ऑनलाइन शिक्षण घेऊन मिळवलेल्या पदवीला मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या पदवीचे महत्त्व देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यूजीसी अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगाने घेतला आहे. The Importance of Accredited Degrees in Distance Education Online Education Degrees
इथून पुढे दूर शिक्षण आणि ऑनलाईन शिक्षणाद्वारे घेतलेली पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी सारखी समकक्ष मानली जाईल. दूर शिक्षण आणि ऑनलाईन शिक्षणाद्वारे मिळवलेल्या पदवीला नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने विविध क्षेत्रांमध्ये तेवढे महत्त्व देण्यात येत नव्हते. यातून शिक्षणातला भेदभाव अधोरेखित होत होता. आता हा भेदभाव यूजीसीने दूर केला आहे.
कोरोना काळात बहुतांश शिक्षण ऑनलाईन झाले. यामध्ये शालेय शिक्षणापासून महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत आणि पदव्युत्तर शिक्षणाचाही समावेश आहे. कोरोना काळात झालेल्या पदवीधरांना नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने समस्या तयार होत आहेत. विविध संस्था कोरोना काळातील पदवीला दुय्यम स्थान देऊन त्या पदवीधरांना नोकरी नाकारताना दिसल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर शिक्षणातला आणि पदवीतला भेदभाव संपवण्यासाठी युजीसीने दूर शिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण यांच्या द्वारे घेतलेल्या पदवीला मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या पदवीची समकक्षा दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App