वृत्तसंस्था
अमेठी : देशातल्या प्रादेशिक पक्षांचे सगळे नेतृत्व हे काँग्रेस कडूनच घराणेशाही शिकले. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने पहिली घराणेशाही आणली आणि त्याचेच अनुकरण नंतर प्रादेशिक पक्षांनी केले, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील अमेठीतून केली आहे.The imitation of the Congress dynasty by the regional parties
अमेठी हा पूर्वी राहुल गांधी यांचा मतदारसंघ होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा पराभव करून ही जागा भाजपच्या ताब्यात आणली. उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत अमेठीत पंतप्रधान मोदींची सभा झाली त्यावेळी त्यांनी काँग्रेससह प्रादेशिक पक्षांच्या घराणेशाहीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. याला राजकीय दृष्ट्या विशेष महत्त्व आहे.
The bond between Amethi and BJP is very strong. Watch. https://t.co/lCNAEHcc2f — Narendra Modi (@narendramodi) February 24, 2022
The bond between Amethi and BJP is very strong. Watch. https://t.co/lCNAEHcc2f
— Narendra Modi (@narendramodi) February 24, 2022
पंतप्रधान मोदी म्हणाले, की स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेसमध्ये घराणेशाहीचा प्रश्न आला नाही. परंतु, स्वातंत्र्यानंतर काँग्रेसवर एका घराण्याने कब्जा केला. ते वर्षानुवर्षे सत्तेवर राहिले. त्यामुळे त्यांचेच अनुकरण देशातल्या प्रादेशिक पक्षांनी केले. प्रादेशिक पक्षांचे सुरुवातीचे नेतृत्व हे काँग्रेसविरोधातूनच पुढे आले होते. पण नंतर या प्रादेशिक पक्षांच्या नेतृत्वाने आपल्याच घराण्यातल्या लोकांकडे पक्षांचे नेतृत्व सोपवले. संपूर्ण देशातल्या लोकशाहीला या घराणेशाहीची वाळवी लागली आहे, असे टीकास्त्र पंतप्रधान मोदींनी सोडले.
अहमदाबाद बाँबस्फोटाटातील 38 आरोपींना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. परंतु, न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत काँग्रेसने किंवा प्रादेशिक पक्षांनी केले नाही. कारण त्यांना स्वतःच्या अल्पसंख्यांक वोटबँकेची चिंता आहे. देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आणि दहशतवादी हल्ल्यात भारतीय नागरिक मारले गेले याची चिंता काँग्रेस किंवा प्रादेशिक पक्षांना नाही. फक्त वोटबँकेची चिंता ते करत आहेत, अशा तिखट शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी हल्लाबोल केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App