विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : फेसबूक कडून सत्ताधाऱ्यांच्या संगनमताने सामाजिक सलोखा बिघडवला जात आहे. ही बाब लोकशाहीसाठी घातक आहे, असे विधान काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लोकसभेत केले. The growing misuse of social media in politics is detrimental to democracy Statement of Sonia Gandhi in Lok Sabha
सोनिया गांधी म्हणाल्या, ” चुकीची माहिती देऊन तरुण तसेच वृद्धाच्या मनात द्वेष पेरला जातो. ही बाब फेसबुक तसेच अन्य जाहीरात कंपन्यांना माहिती आहे. लोकांच्या मनात द्वेष पेरून या कंपन्या नफा मिळवत आहेत.”
सोनिया गांधी यांनी जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीमधील निवडणुकीच्या राजकारणात फेसबूक तसेच इतर समाज माध्यमांचा हस्तक्षेप थांबवावा. सत्ताधाऱ्यांनी यावर अंकुश घालावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी फेसबूक भाजपासाठी सोयिस्कर भूमिका घेत आहे. मेटा अर्थात फेसबूक लोकशाहीसाठी वाईट आहे, असे ट्विट केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App