वृत्तसंस्था
अलिगड : उत्तर प्रदेश सरकार भ्रष्टाचारी आणि प्रशासन गुंडांच्या हातात होते, ते योगी आदित्यनाथ यांनी सोडविले. आता केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार हातात हात घालून विकासाची दमदार पावले टाकत आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशच्या विधानसभेने विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा बिगुल वाजवला.The government of Uttar Pradesh was corrupt and the administration was in the hands of goons, it was solved by Yogi Adityanath; Modi blew the propaganda trumpet
अलिगडमध्ये राजा महेंद्र प्रताप राज्य विद्यापीठाची कोनशिला मोदी यांच्या हस्ते बसविण्यात आली तसेच त्यांनी उत्तर प्रदेश डिफेन्स कॉरिडॉरच्या प्रदर्शनालाही त्यांनी भेट दिली. त्या वेळी झालेल्या कार्यक्रमात मोदी यांनी योगी आदित्यनाथ यांच्या सरकारच्या विकासकामांची प्रशंसा केली.
पंतप्रधान मोदी म्हणाले, की एक काळ असा होता, उत्तर प्रदेशात सरकार भ्रष्टाचारी लोकांच्या हातात होते आणि प्रशासन व्यवस्था गुंडांच्या हातात होती. योगी आदित्यनाथ यांनी सरकार आणि प्रशासन व्यवस्था दोन्ही भ्रष्टाचारी लोक आणि गुंड यांच्या हातातून सोडविली आहे. केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार हातात हात घालून उत्तर प्रदेशाच्या विकासासाठी दमदार पावले टाकत आहे.
There was a time when the administration was run by goons, governance was in the hands of the corrupt, but now such people are behind the bars: PM Modi in Aligarh pic.twitter.com/mIXhsWybv2 — ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) September 14, 2021
There was a time when the administration was run by goons, governance was in the hands of the corrupt, but now such people are behind the bars: PM Modi in Aligarh pic.twitter.com/mIXhsWybv2
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) September 14, 2021
मोठ्या आणि मध्यम गुंतवणूकदारांसाठी उत्तर प्रदेश आज आकर्षणाचे राज्य बनले आहे. संरक्षण उत्पादनापासून ते वस्त्रोद्योगापर्यंत तसेच करमणूक उद्योगापर्यंत विविध स्तरांवर उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. याचा फायदा राज्यातल्या स्थानिक युवकांना रोजगारासाठी आणि नवीन रोजगार निर्मितीसाठी होतो आहे, याकडे पंतप्रधान मोदींनी आवर्जून लक्ष वेधले. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने आठ कोटी जनतेचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण केल्याची घोषणा देखील यांनी केली.
#WATCH | Under Yogi Ji's leadership, Uttar Pradesh has admistered more than 8 cr vaccine doses so far. The State has a record of administering highest doses of vaccines in a day: PM Modi in Aligargh pic.twitter.com/ZD13MeW1vO — ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) September 14, 2021
#WATCH | Under Yogi Ji's leadership, Uttar Pradesh has admistered more than 8 cr vaccine doses so far. The State has a record of administering highest doses of vaccines in a day: PM Modi in Aligargh pic.twitter.com/ZD13MeW1vO
या दौऱ्याच्या निमित्ताने मोदी यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा बिगुल वाजविला. राजा महेंद्र प्रताप विद्यापीठ 2023 मध्ये बांधून पूर्ण होणे अपेक्षित आहे. 79 एकरमध्ये वसलेले हे विद्यापीठ राज्यातील विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक शिक्षणाचे सर्वात महत्त्वाचे केंद्र बनेल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.
उत्तर प्रदेशात प्रियंका गांधी या काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहरा असतील, अशी घोषणा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी केली. एआयएमआयम पक्षाचे नेते असदुद्दीन ओवैसी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. मायावती आणि अखिलेश यादव ब्राह्मणांसह अनेक समाजाचे मेळावे घेत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी राजा महेंद्र प्रताप विद्यापीठाचा कोनशिला समारंभ आणि उत्तर प्रदेश डिफेन्स कॉरिडॉरच्या प्रदर्शनाला भेट याचे निमित्त साधून राज्यात भाजपच्या प्रचाराचा ही बिगुल वाजविला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App