पराभूत निजामाने तयार केलेले गॅझेट मराठा आरक्षणासाठी स्वीकारण्याचे कारण काय??; खासदार शाहू महाराजांचा परखड सवाल

MP Shahu Maharaj

विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : निजामाला मराठ्यांनी तीन वेळा पराभूत केले, त्या निजामाने गॅझेट तयार केले, पण ते मराठा आरक्षणासाठी स्वीकारण्याचे कारणच काय??, असा परखड सवाल काँग्रेसचे खासदार शाहू महाराज यांनी आज केला. या एका सवालातून शाहू महाराजांनी मनोज जरांगे यांना बॅकफूटवर ढकलले.the gazette prepared by the defeated Nizam for Maratha reservation

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं या आपल्या मागणीसाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली होती, मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये उपोषणाला बसले होते, त्यांच्या या आंदोलनामध्ये लाखो मराठा सहभागी झाले, या आंदोलनाची दखल सरकारला घ्यावी लागली, या आंदोलनाला मोठं यश मिळालं, राज्यात हैदराबाद गॅझेट लागू करा ही मनोज जरांगे पाटील यांची मुख्य मागणी मान्य झाली.



पण शाहू महाराजांनी हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या मुद्द्यावर ठळक प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शाहू महाराजांच्या वक्तव्यानंतर आता चर्चेला उधाण आले. मराठा आरक्षणासाठी कोल्हापूर गॅझेट लागू करण्याच्या आंदोलनाला आजपासून सुरुवात झाली.‌ कोल्हापुरातील भवानी मंडपात कोल्हापूर गॅझेटचं आणि पेनाचे पूजन करून या आंदोलनाला सुरुवात झाली. काँग्रेसचे खासदार शाहू छत्रपती आणि इतिहास अभ्यासक जयसिंगराव पवार यांच्या उपस्थितीत या आंदोलनाला सुरुवात झाली, यावेळी बोलताना शाहू महाराज यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

– शाहू महाराज म्हणाले :

– आज वेगळ्या पद्धतीची खंडे नवमी आपण साजरी करतोय, परंपरेनुसार आज शस्त्रांचं पूजन करायचं असतं. भारताने आता लोकशाही स्विकारलेली आहे, त्यामुळे आता त्याच रस्त्यावरून आपल्याला जायचं आहे. संविधानाच्या चौकटीतूनच आपल्याला पुढे जावं लागेल, संविधान लवचिक आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत संविधानामध्ये जे अडथळे आहेत ते दूर करावे लागतील, हे अडथळे दूर केले तरच मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल.

– अनेक पातळ्यांवर मराठा हा समाज मागासलेला आहे हे आता सिद्ध झालं आहे. मराठा आणि कुणबी हे एकच आहेत, हे मी गेले दोन वर्ष सांगत आलोय. मराठा समाजाला आरक्षण देताना दुसऱ्या समाजावर अन्याय होणार नाही, याकडे देखील लक्ष देण्याची गरज आहे. आरक्षणातून मिळणाऱ्या नोकरीवर अवलंबून न राहता पुढे जाण्यासाठी इतर मार्ग देखील अवलंबले पाहिजेत.

– मराठा आरक्षणाच्या प्रश्नांमध्ये 1902 च्या आरक्षण आदेशाचा उल्लेख कुठेही होत नाही, हे दुर्दैव आहे. हैदराबाद गॅझेट हे निजामाने केलेलं गॅझेट आहे. ज्या निजामाला आपण तीन वेळा हरवलं, त्या निजामाचं गॅझेट आपण का स्वीकारतोय?? हे मला कळत नाही. मराठा आरक्षणामध्ये अजून योग्य पर्याय आणि योग्य मार्ग निघालेला नाही. तो योग्य मार्ग काढण्यासाठी कोल्हापूर गॅझेट उपयोगी ठरू शकेल.

the gazette prepared by the defeated Nizam for Maratha reservation??; MP Shahu Maharaj’s sharp question

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात