विशेष प्रतिनिधी
दिल्ली : आम आदमी पक्षाच्या (आप) नेतृत्वाखालील दिल्ली सरकारमधील मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी एका धर्मांतर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. 5 ऑक्टोबर रोजी राजेंद्र गौतम बौद्ध भिक्खूंच्या एका कार्यक्रमात गेले होते जेथे त्यांनी हिंदू देवी-देवतांची पूजा सोडून देण्याची शपथ दिली. The Focus Explainer Insults of Hindu Gods, Controversies and Kejri’s Minister’s Resignation, Read More
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वाद सुरू झाला. ‘आप’च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यामुळे नाराज होते. रविवारी संध्याकाळी दोन पानी पत्र लिहून राजेंद्र गौतम यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला.
वाद कधी सुरू झाला?
आम आदमी पक्षाच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारमधील समाजकल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी 5 ऑक्टोबर रोजी बौद्ध भिक्खूंच्या धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावली होती. ज्यामध्ये हजारो लोकांच्या उपस्थितीत ते भगवान बुद्धांच्या शिकवणींचे पालन करण्याची आणि हिंदू देवी-देवतांची पूजा सोडून देण्याची शपथ घेताना दिसले.
या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते आणि दिल्ली सरकारच्या मंत्र्याच्या उपस्थितीने प्रकरण तापले होते. याप्रकरणी भाजपने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधत गौतम यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली. आम आदमी पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, या घडामोडीवर मुख्यमंत्री फारच नाराज होते. मात्र, यासंदर्भात केजरीवाल यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
भाजपकडून जोरदार निषेध
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपने याला विरोध सुरू केला. दिल्ली भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, आगामी निवडणुकीत व्होट बँकेचे राजकारण पाहता हे काम करण्यात आले आहे.
भाजपच्या दिल्ली युनिटचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत गौतम यांनी दसरा कार्यक्रमात हजारो लोकांच्या उपस्थितीत हिंदू देवी-देवतांचा ‘अनादर’ केल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, ही पहिली घटना नाही. हिंदू देवदेवतांचा अपमान करणे आणि त्यांचा अनादर करणे हा तुमचा स्वभाव आहे.
अखेर राजेंद्र गौतम यांचा राजीनामा
दिल्लीचे मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी धर्मांतराच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यावरून झालेल्या वादात रविवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आपल्या राजीनाम्यात त्यांनी भाजपवर आपल्याविरोधात अफवा पसरवल्याचा आरोप केला आहे. याशिवाय यामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या असतील, तर मी त्यांची माफी मागतो, असेही त्यांनी जनतेला उद्देशून म्हटले.
त्यांनी आपल्या ट्विटमध्ये राजीनामा दिला आहे. त्यांनी लिहिले की, माझ्यामुळे माझे नेते अरविंद केजरीवाल आणि माझ्या पक्षाला कोणतीही अडचण येऊ नये असे मला वाटते. पक्षाचा सच्चा सैनिक या नात्याने तथागत बुद्ध आणि बाबासाहेबांनी दाखविलेल्या न्याय्य आणि समतामूलक घटनात्मक मूल्यांवर मी आयुष्यभर वाटचाल करेन.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App