विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : India-Bhutan railway शतकानुशतकांची शेजारधर्माची नाती आता लोहमार्गातून आणखी घट्ट होणार आहेत. भारत आणि भूतान यांच्यात पहिल्यांदाच रेल्वे दुव्याची घोषणा झाली असून, केंद्र सरकारने तब्बल 4,033 कोटींचा खर्च मंजूर केला आहे. हा प्रकल्प “मेक इन इंडिया”चा एक मोठा टप्पा मानला जात आहे.India-Bhutan railway
बनरहाट (प. बंगाल) – सामत्से (भूतान) या मार्गाची लांबी: 20 किमी, खर्च: ₹577 कोटी, 2 स्थानके, 25 पूल, 1 मोठा फ्लायओव्हर, 24 लहान फ्लायओव्हर, 37 अंडरपास असा आहे. दुसरा मार्ग कोकराझार (आसाम) – गेव्हल्फू (भूतान) असून त्याची लांबी: 69 किमी असून खर्च: ₹3,456 कोटी रुपये आहे. 6 स्थानके, 29 मोठे पूल, 65 छोटे पूल, 2 व्हायाडक्ट, 1 फ्लायओव्हर, 39 अंडरपास आहेत.India-Bhutan railway
या मार्गांवर इलेक्ट्रिफाइड वंदे भारत ट्रेन धावणार आहेत. म्हणजे भूतानमधील प्रवाशांना भारतातल्या आधुनिक रेल्वेगाड्यांचा थेट अनुभव मिळणार.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, “भारत हा भूतानचा सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे. seamless connectivity मिळाल्यामुळे भूतानची अर्थव्यवस्था आणि लोकांचा जागतिक नेटवर्कशी संपर्क वाढणार आहे. म्हणून हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे.”
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितले, “हे दोन रेल्वे प्रकल्प भारत-भूतान संबंधांमधील ऐतिहासिक नवा टप्पा आहेत. यामुळे सामरिक आणि आर्थिक मैत्री अधिक मजबूत होणार आहे.”
हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2024 मधील भूतान भेटीत झालेल्या समझौता करारातून साकारला आहे. यामुळे भारत-भूतान संबंधांना राजनैतिक आणि आर्थिक स्तरावर नवे पर्व लाभले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App