Excise Policy Case : दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणी ‘ED’ची कारवाई; उद्योजक दिनेश अरोराला अटक!


दिनेश अरोरा हे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या जवळचे मानले जातात.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्लीतील अबकारी धोरण प्रकरणी ईडीने गुरुवारी (६ जुलै) उद्योजक दिनेश अरोरा यास अटक केली आहे. या प्रकरणात दिनेश अरोरा हे देखील सीबीआयच्या खटल्यात साक्षीदारही आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.  The Enforcement Directorate has arrested businessman Dinesh Arora in connection with the Delhi excise policy case

ईडीच्या एफआयआरनुसार, अरोरा यांनी उत्पादन शुल्क धोरणाबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती. ईडीने यापूर्वी आपल्या आरोपपत्रात म्हटले होते की दिनेश अरोरा कथितपणे आप नेते विजय नायर यांच्यासोबत काम करत होते. विजय नायरला यापूर्वीच ईडीने अटक केली होती, सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहेत.

कोण आहे दिनेश अरोरा?

सीबीआयच्या म्हणण्यानुसार, दिनेश अरोरा हे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या जवळचे मानले जातात. दिनेश अरोरा हे दिल्लीचे एक मोठे उद्योगपती आहेत आणि रेस्टॉरंट इंडस्ट्रीतील प्रसिद्ध नाव आहेत. अरोरा २००९ पासून या उद्योगाशी संबंधित आहेत.

The Enforcement Directorate has arrested businessman Dinesh Arora in connection with the Delhi excise policy case

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात