पंजाब नॅशनल बॅँकेची फसवणूक करणाऱ्या मेहूल चोक्सीला वाचविण्यासाठी त्याच्या थोरल्या भावाने डॉमिनिकाच्या विरोधी पक्षनेत्याला लाच दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या विरोधी पक्षनेत्याने चोक्सीच्या भारताकडे प्रत्यार्पणाला विरोध करण्यासाठी निवडणूक निधीच्या नावाखाली ही लाच घेतल्याचे म्हटले जात आहे.The eldest brother bribed Dominica’s opposition leader to save Mehul Choksi
विशेष प्रतिनिधी
डॉमिनिका : पंजाब नॅशनल बॅँकेची फसवणूक करणाऱ्या मेहूल चोक्सीला वाचविण्यासाठी त्याच्या थोरल्या भावाने डॉमिनिकाच्या विरोधी पक्षनेत्याला लाच दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या विरोधी पक्षनेत्याने चोक्सीच्या भारताकडे प्रत्यार्पणाला विरोध करण्यासाठी निवडणूक निधीच्या नावाखाली ही लाच घेतल्याचे म्हटले जात आहे. कॅरेबियन माध्यमसमूह असोसिएटस टाईम्सने म्हटले आहे
की हिरे व्यापारी मेहूल चोक्सीचा थोरला भाऊ चेतन चिनूभाई चोक्सी मेहूलला अटक झाल्यावर २९ मे रोजी डॉमिनिकामध्ये आला. दुसऱ्या दिवशी त्याने डॉमिनिकाचे विरोधी पक्षनेते लेनॉक्स लिंटन यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
दोघांची सुमारे दोन तास चर्चा झाली. यावेळी निवडणूक निधी देण्याच्या बदल्यात लिंटन यांनी मेहूल चोक्सीच्या प्रत्यार्पणाच्या मुद्यावर त्यांनी संसदेत विरोध करावा, असे सांगण्यात आले.
चेतन चोक्सी हे हॉंगकॉँमधील डिजीको होल्डींग या कंपनीची उपकंपनी असलेल्या डिमीनीको एनव्ही ही उपकंपनी चालवितात. ही कंपनी हिरे आणि दागदागिने क्षेत्रातील एक बडी कंपनी मानली जाते.
निरव मोदीची लंडनमध्ये २०१९ मध्ये न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळीही चेतन चोक्सी न्यायालयाच्या परिसरात उपस्थित होते.लिंटन यांनी मेहूल चोक्सी याला केलेली अटक बेकायदेशिर असल्याचे म्हटले आहे.
डॉमिनिकाचे पंतप्रधान रुझवेल्ट स्केरिट यांनी हा कट रचल्याचा आरोप त्यांनी केला आहे. स्केरिट यांनी इस्टर्न कॅरेबियन सुप्रिम कोर्टच्या नियमावलींचा भंग केल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
लिंटन हे डॉमिनिकाच्या युनायटेड वर्कर्स पार्टीचे नेते आहे. चोक्सी याची अटक आणि त्याचे हस्तांतरण याबाबत संपूर्ण चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
या सगळ्या प्रकारात डॉमिनिका, अॅँटिगुआ आणि बारबुडा आणि भारत यांच्यामध्ये युती होऊन बेकायदेशिरपणे चोक्सीला अटक करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App