MK Stalin तामिळनाडूत DMK स्टालिन अण्णा सरकारची दुटप्पी भूमिका; हिंदीला लाथा, अन् उर्दूला डोक्यावर घेऊन नाचा!!

MK Stalin

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : तामिळनाडूत DMK स्टालिन अण्णांच्या सरकारची दुटप्पी भूमिका; हिंदीला लाथा, उर्दूला डोक्यावर घेऊन नाचा!!, असला प्रकार समोर आलाय.

२०२६ च्या विधानसभा निवडणुकांवर नजर ठेवून मुख्यमंत्री स्टालिन अण्णांनी तामिळनाडूत हिंदी भाषेचा द्वेष वाढविला. मोदी सरकारचा तीन भाषा फार्म्युला नाकारला. हिंदी भाषेवर वाटेल ते घाणेरडे आरोप केले. हिंदी भाषेने २५ बोली भाषा आणि संस्कृती गिळून टाकल्या, असली बकवास केली. तामिळनाडूच्या सरकारी शाळांमध्ये हिंदी भाषा शिकवायला नकार दिला. DMK खासदारांनी संस्कृत भाषेवर अश्लाघ्य भाषेत टीका केली.

पण याच स्टालिन अण्णांच्या सरकारने DMK पक्षाच्या नेत्यांच्या खाजगी शाळांमध्ये मात्र हिंदी शिकवायची परवानगी दिली आणि सोयही उपलब्ध करून दिली. पण त्या पलीकडे जाऊन स्टालिन अण्णांच्या सरकारने उर्दू भाषेला मात्र कवटाळून धरले. स्वतः स्टालिन अण्णांचा मुलगा आणि तामिळनाडूचा उपमुख्यमंत्री उदयनिधी यानेच DMK पक्षाने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत त्या संदर्भात मोठे खुलास केले.

तामिळनाडूचे DMK सरकार सरकार मुस्लिमांसाठी नेहमीच काम करते. कल्याणकारी योजना आणते. DMK सरकारनेच तामिळनाडू उर्दू अकॅडमी स्थापन केली. तिला भरघोस निधी उपलब्ध करून दिला. तामिळनाडूमध्ये 275 पेक्षा जास्त उर्दू शाळांना अनुदान दिले. केंद्र सरकारने ज्यावेळी ट्रिपल तलाक किंवा waqf बोर्ड सुधारणा कायदे आणले, त्याला DMK खासदारांनी संसदेत ठाम विरोध केला. त्यामुळे तामिळनाडूतल्या मुस्लिमांनी DMK सरकारलाच पाठिंबा दिला पाहिजे, असे उदयनिधी म्हणाले.

त्या पलीकडे जाऊन स्टालिन अण्णांच्या सरकारने 2023 मध्ये एक पक्षपाती निर्णय घेतला. तामिळनाडूमध्ये मुस्लिम विद्यार्थ्यांना जर दुसरी भाषा म्हणून तमिळ शिकायची नसेल, तर त्याला DMK सरकारने मुभा दिली. एकीकडे हिंदी भाषेचा द्वेष, दुसरीकडे उर्दू भाषेला कवटाळणे आणि त्याही पुढे जाऊन मुस्लिम मुलांना जर विद्यार्थ्यांना जर तामिळ भाषाच शिकायची नसेल तरी त्याला मूभा असा पक्षपाती निर्णय स्टालिन अण्णांच्या सरकारने केला. AIADMK आणि भाजप या दोन्ही विरोधी पक्षांनी संबंधित निर्णयाला तीव्र विरोध केला. पण मुस्लिम तुष्टीकरणासाठी DMK सरकारने हा निर्णय कायम ठेवला.

The double-edged sword of the DMK  MK Stalin government in Tamil Nadu

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात