Operation sindoor भारताने यशस्वी करून पाकिस्तानच्या दहशतवादाला धडा शिकवला. सगळा पाकिस्तान भारतीय हल्ल्याच्या टप्प्यात आणला. त्यांचे 20 % हवाई दल नष्ट केले. तरी पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी पाकिस्तानच्या विजयाचे झेंडे उंच उंच फडकावले. पाकिस्तानी जनरल असीम मुनीरला फिल्ड मार्शली बहाल केली. पाकिस्तानने 1971 च्या युद्धाचा बदला घेतला, अशा गर्जना पाकिस्तानी पंतप्रधान शहाबाज शरीफने केल्या.
मात्र, पाकिस्तान निर्मितीसाठी मोहम्मद अली जिना यांनी स्थापन केलेल्या The Dawn या वृत्तपत्राने पाकिस्तानी राज्यकर्त्यांचे तोंड फोडले. “पाकिस्तानी विजयाचे झेंडे” उतरवले. पाकिस्तानी राज्यकर्त्यांचा सगळा खोटेपणा उघड्यावर आणला. The Dawn ने 24 मे 2025 रोजी लिहिलेल्या अधिकृत संपादकीय अर्थात अग्रलेखात पाकिस्तानी राज्यकर्त्यांचा बुरखा फाडला. पाकिस्तानचे पंतप्रधान ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तानचा विजय झाला, असे म्हणू कसे शकतात?? 1971 च्या युद्धाचे सत्य त्यांना माहिती तरी आहे का??, त्यावेळी पाकिस्तानी लष्करशहांनी कोणत्या चुका केल्या?? त्या भारताने आपल्या पथ्यावर कशा पाडून घेतल्या??, त्याचा परिणाम स्वतंत्र बांगलादेश निर्मितीत कसा झाला??, याचे सविस्तर वर्णन The Dawn ने अग्रलेखात केले.
The Dawn हे तेच वृत्तपत्र आहे, जे मोहम्मद अली जिना यांनी पाकिस्तान निर्मितीच्या प्रपोगंडाला बळ देण्यासाठी स्थापन केले या वृत्तपत्राने कायम मुस्लिम लीगची पाठराखण केली. तिचेच धोरणे राबवली. पण आज त्याच The Dawn ने पाकिस्तानी राज्यकर्त्यांचे पुरते वाभाडे काढले, म्हणून तर त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
– The Dawn ने अग्रलेखात म्हटले की :
1971 च्या युद्धापूर्वी फिल्ड मार्शल मोहम्मद अयुब खान आणि जनरल याह्या खान यांनी पूर्व पाकिस्तान मधली परिस्थिती नीट ओळखलीच नाही. तिथल्या नागरिकांना हक्क आहेत त्यांची भाषा पाकिस्तानने जपली पाहिजे, तिथल्या नागरिकांना मूलभूत सुविधा दिल्या पाहिजेत याकडे लक्ष दिले नाही म्हणून पूर्व पाकिस्तान मधला असंतोष सतत उफाळत राहिला. अयुब खान आणि याह्या खान यांनी फक्त प्रशासकीय दृष्ट्या पूर्व पाकिस्तान मधल्या समस्येवर मलमपट्टी केली. तिथल्या जनतेला विश्वासात घेऊन तिथे आणि संपूर्ण पाकिस्तानात लोकशाही न्यायोचित राजकीय प्रक्रियाच राबविली नाही. लोकांना आणि लोकप्रतिनिधींना त्यांचे हक्क बहाल केले नाहीत म्हणून पूर्व पाकिस्तानात हिंसाचार उफाळला. तो टोकाला गेला. त्याचा गैरफायदा भारताने घेतला. पाकिस्तानच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करून पाकिस्तानची फाळणी केली. स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती केली.
पण The Dawn ने फक्त या अर्धसत्याचीच कबुली दिली. पाकिस्तानी लष्करातल्या अधिकाऱ्यांनी आणि सैनिकांनी लाखो बांगलादेशी महिलांवर बलात्कार केले. लाखो बांगलादेशी नागरिकांचे शिरकाण केले, हे सत्य लिहिले नाही. पण म्हणून ते सत्य लपूनही राहिले नाही.
The Dawn ने पुढे लिहिले की,
सध्याच्या पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी आपल्या विजयाचे झेंडे फडकवण्यापेक्षा पाकिस्तानातले अंतर्गत परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. देशातल्या जनतेत असंतोष का आहे??,त्यांचे हक्क आणि मूलभूत सुविधा त्यांना मिळतात का??, याकडे लक्ष पुरविले पाहिजे. खुद्द पाकिस्तानातच दहशतवाद का वाढतोय??, भारताला पाकिस्तानच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याची संधी का मिळते??, या सवालांची खरी उत्तर शोधली पाहिजेत. पाकिस्तानातल्या राजकीय पक्षांमध्ये संवादाचा पूर्ण अभाव आहे, तो पुन्हा प्रस्थापित केला पाहिजे. नागरिकांना मूलभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य देण्यावर भर दिला पाहिजे. उगाच भारतावर सूड उगवल्याची प्रक्षोभक भाषणे करून हे साध्य होणार नाही. त्यासाठी जमिनी स्तरावर खूप काम करावे लागेल, तरच पाकिस्तानचा खरा उदय होईल. (अन्यथा जुन्याच मार्गावर जाऊन पाकिस्तान पुन्हा फुटेल), असा अप्रत्यक्ष इशारा The Dawn ने पाकिस्तानी राज्यकर्त्यांना दिला.
Operation Sindoor मधल्या भारताच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या नेत्यांनाही The Dawn ने अग्रलेखातून अप्रत्यक्षपणे धडा शिकवून घेतला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App