विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Vice President Election : माजी उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणामुळे राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपराष्ट्रपती पदासाठी उद्या मतदान पार पडणार आहे.
उपराष्ट्रपती पदासाठी सत्ताधारी एनडीए आघाडी आणि विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीने जोरदार मोर्चे बांधणी केल्याचे पाहायला मिळत आहे. उपराष्ट्रपती पदासाठी एनडीए आघाडीने महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यपाल सीपी राधाकृष्ण यांना उमेदवारी दिली आहे. तर इंडिया आघाडीने निवृत्ती न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी यांना मैदानात उतरवले आहे. दोन्ही आघाडीकडून दक्षिणेतील उमेदवार मैदानात उतरवले आहेत. पुढील वर्षी तमिळनाडूमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे उमेदवार असल्याचे बोलले जात आहे.
आपलाच उमेदवार निवडून आणण्यासाठी दोन्ही आघाडी कडून मताची जुळवा जुळव करण्याचे प्रयत्न चालू आहेत. इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांचा नक्षलवाद्यांशी संबंध जोडून भाजपने त्यांच्याविरोधी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. एनडीए मधील घटक पक्षांच्या खासदारांना सुद्धा त्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले आहे.
इंडिया गाडीने सुद्धा आपल्या उमेदवारासाठी मत जुळवणी करण्यासाठी प्रयत्न केले. दक्षिणेतील उमेदवार देऊ दक्षिणेतील स्थानिक पक्षांना आपल्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन काँग्रेसने केले. तसेच मतफोडी होणार नाही यासाठी देखील इंडिया आघाडी सतर्क असल्याचे पाहायला मिळत आहे.
दोन्ही आघाडीतील खासदारांना मतदान कसे करायचे याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. निवडणुकीमध्ये सत्ताधारी एनडीए आघाडीला स्पष्ट बहुमत असल्याचे दिसून येत आहे. तरीसुद्धा विरोधी पक्षांनी मजबूत एकजूट दाखवत लढतीमध्ये रंग भरला आहे.
दरम्यान तेलंगाना मधील के सी आर च्या बी आर एस ने मात्र दोन्ही आघाड्यांना पाठिंबा न देण्याची भूमिका घेतली आहे.
उद्या सकाळी दहा वाजता उपराष्ट्रपती पदासाठी मतदान होईल. पाच वाजता मतदान पूर्ण होईल. सहा वाजता मतमोजणीला सुरुवात होईल आणि त्यानंतर लगेचच विजयी उमेदवाराचे नाव घोषित केले जाईल. दोन्ही आघाडीकडून आपल्या खासदाराचे मतदान अवैध ठरणार नाही यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.
सद्यस्थितीला पाहिले असता इंडिया आघाडीकड 439 खासदारांचे तर इंडिया आघाडीकडे 324 खासदारांचे पाठबळ आहे. विजय उमेदवाराला निवडून येण्यासाठी 391 मतांची आवश्यकता आहे. इंडिया गाडीकडे बहुमतापेक्षा 48 जास्तीचे मतदान आहे तर इंडिया आघाडीकडे बहुमतापेक्षा 67 मतदान कमी आहे. पण उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी व्हिप जारी केला जाऊ शकत नाही. त्यामुळे क्रॉस वोटिंग ची शक्यता नाकारता येत नाही.
उडीसातील स्थानिक पक्ष बिजू जनता दल चे सात मतदान, बी आर एस चे चार मतदान, तसेच अकाली दल , ZPM , VOTTP या पक्षांचे प्रत्येकी एक एक मतदान तर अपेक्षा असणाऱ्या तीन खासदारांचे मत कोणाला होते याकडेही लक्ष असणार आहे.
उद्याच्या निवडणुकीत इंडिया आघाडीच्या उमेदवाराचे पारडे जड दिसत असले तरी क्रॉस वोटिंग आणि भूमिका जाहीर न केलेल्या छोट्या पक्षांच्या मतांमुळे इंडिया आघाडीला देखील विजयाची आस आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक रंगतदार बनली आहे. उद्या मतदान होऊन देशाला 50 दिवसानंतर नवा राज्यपाल मिळेल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App