देशात रशियन लोकसंख्येएवढे मद्य, अमेरिकेपेक्षा जास्त नशेखोर; 372 जिल्हे अंमली पदार्थांच्या विळख्यात

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतातील नशेखोरीच्या महामारीबाबत गंभीर आकडे समोर आले आहेत. राष्ट्रीय पातळीवर केलेल्या एका सर्वेक्षणात उघड झाले की, १० ते ७५ वयोगटातील लोकसंख्येत नशा करणाऱ्यांची संख्या ३७ कोटीवर गेली आहे. ही संख्या जगातील तिसऱ्या मोठ्या लोकसंख्येचा देश अमेरिकेपेक्षा जास्त आहे.The country has as much alcohol as the population of Russia, more drunkards than America; 372 districts under drug addiction

हे सर्वेक्षण समाज कल्याण व सशक्तीकरण मंत्रालयाने एम्सच्या नॅशनल ड्रग्ज डिपेंडन्स ट्रीटमेंट सेंटरद्वारे केले आहे. मंत्रालयाने हे आकडे संसदेत शेअर केले आहेत. त्यानुसार, नशेचे व्यसन असणाऱ्यांत मद्यपान करणाऱ्यांची संख्या १६ कोटीपर्यंत पोहोचली आहे. ही रशियाच्या लोकसंख्येबरोबर आहे. गंभीर बाब म्हणजे, मद्यपान करणाऱ्यांत सुमारे १९% असे लोक आहेत,जे दारूशिवाय राहू शकत नाहीत.सर्वेक्षणानुसार, १७ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये २० लाख असे आहेत, ज्यांना गांज्याचे व्यसन आहे आणि २.२६ कोटी व्यक्ती म्हणजे एकूण लोकसंख्येच्या २.१% अफू, गांजा, हेरॉइन, स्मॅक आणि ब्राऊन शुगरसारख्या ड्रग्जच्या जाळ्यात अडकले आहेत.दारू आणि अन्य ड्रग्जसाठी संवेदनशील मानल्या गेलेल्या देशातील २७२ जिल्ह्यांची निवड व्यसनमुक्ती अभियानासाठी केली होती. यानंतर यात आणखी १०० जिल्ह्यांचा समावेश केला. आता या अभियानाअंतर्गत ३.३४ कोटी युवांपर्यंत पोहोच बनवली आहे. यामुळे नशेचे व्यसन सोडवले जाऊ शकते. विविध सरकारी अहवालानुसार, १० ते १७ वयोगटातील मुलांमध्ये अफू, सॅडेटिव्हज आणि इनहेलेंट्रसचा ट्रेंड वाढला आहे. यात सर्वाधिक प्रभावित राज्य आंध्र प्रदेश, आसाम, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, बिहार, झारखंड, एनसीटी दिल्ली, ओडिशा, पंजाब, राजस्थान, तेलंगण, उत्तर प्रदेश ,प. बंगाल आहे.



भारतात या मार्गाने पोहोचतात ड्रग्ज

इथिओपिया, नायजेरिया, युगांडा आदी देशांतून औषधे दुबई, शारजाहमार्गे भारतात पोहोचतात.तस्कर प्रामुख्याने हेरॉइन, कोकेन आणत आहेत. हे पदार्थ चेक-इन बॅगेजमध्ये आणले जात आहेत. नेपाळ, म्यानमारच्या मार्गाने गांजा, चरस अफूची तस्करी होत आहे.

बजेट खर्च केले नाही सरकारने

अंमली पदार्थांचे साथीचे आजार पसरले असतानाही व्यसनमुक्ती अभियानाचे बजेट खर्च केले जात नाही. 2020-21 मध्ये 260 कोटींचे बजेट ठेवण्यात आल्याचे दिसले. 2021-22 मध्ये समाजकल्याण विभागाला केवळ 90.93 कोटी रुपये आणि 97.85 कोटी रुपये खर्च करता आले.

The country has as much alcohol as the population of Russia, more drunkards than America; 372 districts under drug addiction

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात