विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक प्रकल्पांच्या किंमतीत कमालीची घट केल्याचा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी दावा आहे. गडकरी यांनी मंगळवारी लोकसभेत सांगितले की, ब्रह्मपुत्रा नदीवरील माजुली पुलाच्या बांधकामाचा खर्च ६ हजार कोटींवरून ६८० कोटींवर आला आहे. सरकारने पुलांच्या बांधकामात असे तंत्रज्ञान आणले आहे, ज्यामुळे दोन खांबांमधील अंतर ३० मीटरवरून १२० मीटरपर्यंत वाढेल, असा दावा त्यांनी केला. तसेच कास्टिंग बीम स्टील आणि फायबरमध्ये असतील.The cost of construction of the bridge has gone up from Rs 6,000 crore to Rs 680 crore
गडकरींनी सांगितले की, आसामचे तत्कालीन मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या प्रचारासाठी माजुली येथे गेलो होतो. हेलिकॉप्टरमध्ये सोनोवाल हात दाबून सांगत होते की तुम्ही पुलाच्या बांधकामाची घोषणा करा. गडकरी म्हणाले, मी म्हणालो की मला माहित नाही किंमत किती आहे. तुम्ही जबरदस्ती करत आहात. त्यावर लोक पूल नसल्याने संतप्त आहेत. तुम्ही पुलाची घोषणा करा, नाही तर मी निवडणूक हरेन, असे सोनोवाल म्हणाले. हे मी भावूक झालो आणि माजुलीवर पूल बांधण्याची घोषणा केली.
गडकरी म्हणाले की, दिल्लीत आल्यावर पुलाच्या खर्चाबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केली. त्याची किंमत ६,००० कोटी रुपये असेल असे सांगण्यात आले. त्यामुळे एका पुलासाठी सहा हजार कोटी कसे द्यायचे या विचाराने मी पूर्णपणे खचलो. पण या निमित्ताने मोठे काम झाले आहे. आम्ही सिंगापूर आणि मलेशियाचे तंत्रज्ञान आणि उर्वरित नवीन तंत्रज्ञान वापरले. त्यानंतर सहा हजार कोटींचा माजुलीचा पूल ६८० कोटी रुपयांवर आला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App