वृत्तसंस्था
लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कानपूरच्या सभेत दंगल घडवण्याचा कट रचल्याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी समाजवादी पक्षाच्या 5 कार्यकर्त्यांविरुद्ध एफआयआर दाखल केला. त्यापैकी एकाला काल अटक झाली. समाजवादी पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी या प्रकरणात 5 कार्यकर्त्यांना पक्षातून बडतर्फ केले आहे.The conspiracy of riots in Modi’s Kanpur meeting was hatched by Samajwadi Party workers !!; 5 activists from Akhilesh Yadav to Bad
सचिन केसरवानी, अंकुर पटेल, सुशील राजपूत, अंकेश यादव, सुकांत शर्मा अशी या समाजवादी पक्षाच्या 5 कार्यकर्त्यांची नावे आहेत. त्यांना अखिलेश यादव यांनी पक्षातून बडतर्फ केले आहे.
पोलिसांनी सीसीटीव्ही आणि व्हिडिओ फुटेजच्या आधारे समाजवादी पक्षाच्या एका कार्यकर्त्याला काल अटक केली होती. एक कारही जप्त करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या रॅलीपूर्वी कानपूरच्या नौबस्तामध्ये अल्टो कारची तोडफोड करण्यात आली आणि पुतळ्याचे दहन करण्यात आले.
रॅलीपूर्वी तोडफोड आणि जाळपोळीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. कलम 147, 148, 153-अ, 336, 427, 435, 341, 34, 500 505 (2) अन्वये आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
"Samajwadi Party suspends 5 of its members for alleged involved in yesterday's incident in Kanpur," says the party pic.twitter.com/5AEXCNzhZm — ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) December 29, 2021
"Samajwadi Party suspends 5 of its members for alleged involved in yesterday's incident in Kanpur," says the party pic.twitter.com/5AEXCNzhZm
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) December 29, 2021
एफआयआरमध्ये असे लिहिले आहे की, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये समाजवादी पक्षाच्या 8 ते 10 कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या पांढऱ्या कारवर दगडफेक केल्याचे दिसून येते. पंतप्रधानांच्या पुतळ्याचे दहन करून जाळपोळ करण्यात आली.
व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. चौकशीदरम्यान असे आढळून आले की, 8 ते 10 मुलांनी (ज्यांनी लाल टोप्या घातल्या होत्या) मोदींचा पुतळा जाळला आणि पांढऱ्या रंगाच्या अल्टो कारवर दगडफेक केली. अनेकवेळा मुख्य रस्ता अडवून घोषणाबाजी करण्यात आली, त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनावर संकट आले.
भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) कानपूरच्या 54 व्या दीक्षांत समारंभात सहभागी होण्यासाठी आणि कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाची सुरुवात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी कानपूरला गेले होते. रेल्वे ग्राउंड, निराला नगर, कानपूर नगर येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी 11 हजार कोटी रुपये खर्चाच्या कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App