वृत्तसंस्था
मुंबई : t 20 वर्ल्ड कप संपल्यानंतर न्यूझीलंड विरुद्ध भारताची कसोटी मालिका भारतात खेळविली जाणार आहे. यातली पहिली कसोटी कानपूरला खेळवली जाणार असून या कसोटीसाठी भारतीय संघाचे कर्णधारपद विराट कोहली किंवा रोहित शर्मा यांच्याकडे न देता मधल्या फळीतील फलंदाज अजिंक्य राहणे यांच्याकडे देण्यात आले आहे.The captaincy of the Indian team goes to Ajinkya Rahane for the Kanpur Test against New Zealand
पहिल्या कसोटीसाठी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना विश्रांती देण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घेतला आहे. त्यामुळे संघाचे कर्णधारपद अजिंक्य राहणे यांच्याकडे चालून झाले आहे.
अजिंक्य रहाणे कसोटी सामन्यात भारतासाठी कायमच भरवशाचा खेळाडू राहिला आहे. आवश्यक तेथे आक्रमक आणि गरज असेल तेथे संयमी फलंदाजी करून अनेकदा त्याने भारताचा डाव सावरला आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्या संघाला त्यांच्या देशात धूळ चारण्यामध्ये अजिंक्य रहाणेचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. त्यामुळे त्याच्याकडे भारतीय संघाचे न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठीचे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे.
दुसरी कसोटी मुंबई येथे खेळविण्यात येणार आहे. त्यावेळी विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांचाही संघात समावेश करण्यात येणार आहे त्यामुळे आपोआपच विराट कोहली याच्याकडे भारतीय संघाचे कर्णधारपद जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App