जंगलात सापडलेली हाडे श्रद्धाचीच; वडिलांशी DNA झाला मॅच; आफताबचे होते आव्हान; दिल्ली पोलिसांना मोठे यश

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : लव्ह जिहाद श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी संपूर्ण देश हादरला, आरोपी आफताब पूनावालाने श्रद्धाचे ३५ तुकडे करत तिच्या शरीराचे भाग जंगलात फेकले होते. दिल्ली पोलिसांना तपासादरम्यान मेहरोलीच्या जंगलात हाडे सापडले होती. जंगलात सापडलेले पुरावे आणि हाडांचा डीएनए श्रद्धाच्या वडिलांशी जुळला असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. The bones found in the forest belong to Shraddha; DNA match with father

श्रद्धाची हाडे आणि तिचा मृतदेह शोधून काढा, असे आव्हान आफताबने पोलिसांना दिले होते. तो पोलिसांशी खोटे बोलून दिशाभूल पण करत होता. पण आता मेहरोली परिसरात पोलिसांना सापडलेली हाडे श्रद्धाची असल्याचे स्पष्ट झाले आहे.


लव्ह जिहाद : श्रद्धाचे 35 तुकडे करणाऱ्या आफताब आणि त्याच्या परिवारालाही कठोर शिक्षा द्या; श्रद्धाच्या वडिलांचा संताप


या प्रकरणी आरोपी आफताब पूनावालाची पॉलिग्राफ आणि नार्को टेस्ट करण्यात आली होती. यात आफताब पोलिसांची दिशाभूल करत होता. परंतु, आता श्रद्धाच्या हाडांचा डीएनए तिच्या वडिलांशी मॅच झाल्यामुळे पोलिसांना तपासात मोठे यश आले आहे. श्रद्धा वालकर आणि आफताब हे दोघेही भाड्याने राहत असलेल्या घरात पोलिसांनी रक्ताचे डाग सुद्धा सापडले होते. त्या रक्ताचा डीएनए सुद्धा श्रद्धा वालकरच्या वडिलांशी जुळला आहे. यामुळे आफताबनेच श्रद्धाची हत्या केल्याचे सिद्ध झाले आहे.

दिल्ली पोलिसांनी आफताबच्या खोलीतून आणि मेहरोली येथील जंगलातून हत्याकांडातील हाड, जुने रक्ताचे डाग असे नमुने गोळा केले होते आणि ते तपासासाठी सीएफएसएल आणि एफएसएलकडे पाठवले होते. याचा डीएनए रिपोर्ट आला असून त्याचा डीएनए श्रद्धाच्या वडिलांशी जुळला असल्याने ही केस आता पुढे सरकणार आहे.

The bones found in the forest belong to Shraddha; DNA match with father

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात