विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Thackeray Group आशिया कप 2025 स्पर्धेमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामने होणार आहेत. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट सामने खेळण्यास विरोध केला आहे. या संदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आपला विरोध दर्शवला आहे.Thackeray Group
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला आपला विरोध असल्याचे प्रसार माध्यमाची बोलताना कालच सांगितले होते. त्यानंतर त्यांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या संदर्भातले पत्र पाठवले आहे. यामध्ये त्यांनी हे देशवासीयांसाठी हे वेदनादायक असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान आणि गृह मंत्रालयाच्या परवानगीशिवाय हा निर्णय होणे शक्य नाही, असा दावा देखील संजय राऊत यांनी आपल्या पत्रामध्ये केला आहे.Thackeray Group
हे प्रत्येक देशवासीयांसाठी वेदनादायक
संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या क्रिकेट सामन्याला विरोध दर्शवला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, पहलगाम येथील हल्ल्यात शहीद झालेल्यांचे रक्त अद्याप सुकलेले नाही. या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांच्या डोळ्यातील अश्रू अजूनही थांबलेले नाहीत. तरीही पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळण्यास क्रीडा मंत्रालयाने हिरवा कंदील दिला आहे. हे प्रत्येक देशवासीयांसाठी वेदनादायक असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
आशिया कप 9 सप्टेंबरपासून सुरू होणार
आशिया कप 2025 हा युएईमध्ये खेळला जाणार आहे. ही स्पर्धा 9 सप्टेंबरपासून सुरू होऊन 28 सप्टेंबरपर्यंत चालेल. यात आठ संघ सहभागी होतील. भारत, पाकिस्तान, ओमान आणि युएई यांना एकाच गटात स्थान देण्यात आले आहे. श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग हे गट-ब मध्ये आहेत. गटातील सर्व संघ एकमेकांविरुद्ध 1-1 सामने खेळतील. भारताचा सामना 10 सप्टेंबर रोजी युएई, 14 सप्टेंबर रोजी पाकिस्तान आणि 19 सप्टेंबर रोजी ओमानशी होईल.
भारताने 8 वेळा आशिया कप जिंकला
आशिया कपची सुरुवात 1984 मध्ये झाली. ही स्पर्धा आतापर्यंत 16 वेळा खेळली गेली आहे. भारताने सर्वाधिक म्हणजे 8 वेळा जिंकली आहे. श्रीलंकेने 6 वेळा आणि पाकिस्तानने 2 वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App