नाशिक : ठाकरे बंधूंच्या ऐक्याचे जोरदार लॉन्चिंग, पण त्यामध्ये पवारांनी उरकून घेतले सुप्रिया सुळे यांच्यासह दुसऱ्या फळीच्या आणि छोट्या पक्षांच्या नेत्यांचेही उप लॉन्चिंग!!, असा प्रकार वरळीच्या डोम मध्ये घडला. ठाकरे बंधूंचा ऐक्य मेळावा अपेक्षेपेक्षा यशस्वी ठरला. यामध्ये दोघांनी आपल्याला बाळासाहेब ठाकरे यांनी नव्हे, तर देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र आणले, असे सांगून भविष्यातले “टार्गेट” कोण हे दाखवून दिले. Thackeray Brothers
ठाकरे बंधूंच्या ऐक्य मेळाव्याचा “फोकस” त्यांच्यावरच राहणार असल्याने शरद पवारांनी या ऐक्य मेळाव्याकडे पाठ फिरवली. पण महाराष्ट्राचे सगळे राजकारण फक्त ठाकरे बंधूंभोवतीच फिरणे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणि पुढच्या पिढीला राजकीय दृष्ट्या परवडणार नाही हे लक्षात येताच त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना या मेळाव्याला पाठवून दिले. पण ठाकरे बंधूंनी सुप्रिया सुळे यांचे स्थान आपल्या बरोबरीने व्यासपीठावर ठेवले नव्हते. व्यासपीठावर फक्त उद्धव आणि राज यांच्यासाठीच खुर्च्या ठेवल्या होत्या.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मुख्य भाषणांच्या वेळी सगळ्या नेत्यांना खाली खुर्च्यांवर पहिल्या रांगेत बसविण्यात आले होते. यामध्ये कॉम्रेड प्रकाश रेड्डी, कॉम्रेड अजित नवले, खासदार सुप्रिया सुळे महादेव जानकर, शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील, काँग्रेसचे माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आदी नेत्यांचा समावेश होता.
ठाकरे बंधू आज एकत्र आलेत ते पुढे एकत्र राहण्यासाठीच, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली. दोन्ही ठाकरे बंधूंची भाषणे झाल्यानंतर वर उल्लेख केलेल्या सर्व नेत्यांना व्यासपीठावर बोलविण्यात आले. दोन्ही ठाकरे बंधूंनी त्यांचे व्यासपीठावर स्वागत केले. या सगळ्यांनी एकत्र येऊन व्यासपीठावरून समोरच्या गर्दीला अभिवादन केले.
या सगळ्यातून ठाकरे बंधूंनी आपले नेतृत्व इतर पक्षांपेक्षा मोठे असल्याचे स्पष्ट केले.पण त्याचवेळी शरद पवारांनी या मेळाव्याला गैरहजर राहून सुप्रिया सुळे यांचे मात्र उप लॉन्चिंग करून घेतले.
उद्धव ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच जमलेल्या माझ्या तमाम मराठी आणि हिंदू बांधवांना असा उल्लेख करून हिंदुत्वाचा आणि मराठीचा ठसा आपल्यावर कायम असल्याचे दाखवून दिले. त्यावेळी त्यांच्यासमोर कम्युनिस्ट पक्षाचे दोन नेते बसले होते. बाळासाहेबांनी मराठीचा गजर करताना मुंबईवरच्या ज्या कम्युनिस्ट पार्टीचा ठसा पुसला, त्या कम्युनिस्ट पार्टीचे दोन प्रतिनिधी कॉम्रेड प्रकाश रेड्डी आणि कॉम्रेड अजित नवले हे उद्धव आणि राज ठाकरे भाषण करताना समोर हजर होते. पण आजच्या ठाकरे ऐक्य मेळाव्याचे हे वैशिष्ट्य मराठी माध्यमांनी सांगितले नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App