जम्मू -काश्मीरच्या श्रीनगरमध्ये रविवारी दहशतवाद्यांनी एका पोलीस पथकावर हल्ला केला. जुन्या श्रीनगरच्या खानयार भागात झालेल्या या हल्ल्यात एका पोलीस निरीक्षकाला अनेक गोळ्या लागल्या आहेत, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. Terrorists attack police party in Srinagar, bullets fired at inspector
वृत्तसंस्था
श्रीनगर : जम्मू -काश्मीरच्या श्रीनगरमध्ये रविवारी दहशतवाद्यांनी एका पोलीस पथकावर हल्ला केला. जुन्या श्रीनगरच्या खानयार भागात झालेल्या या हल्ल्यात एका पोलीस निरीक्षकाला अनेक गोळ्या लागल्या आहेत, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, दहशतवाद्यांनी पोलीस पथकाला लक्ष्य केले. हल्ल्यानंतर लगेचच पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला आणि शोधमोहीम सुरू केली आहे.
बऱ्याच काळापासून दहशतवादी जम्मू -काश्मीरमध्ये घातपात घडवण्याच्या तयारीत आहेत. कधी ते स्थानिक नेत्यांना लक्ष्य करतात, तर कधी लष्कर आणि पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला करतात. सैनिकही पूर्ण तयारीने दहशतवाद्यांचा सामना करून त्यांना शोधण्यात व्यग्र आहेत.
गेल्या महिन्याच्या शेवटी देशाच्या गुप्तचर संस्थांनी 15 दिवसांच्या आत दहशतवादी हल्ल्यांचे 10 पेक्षा जास्त अलर्ट जारी केले होते. सर्व अलर्टमध्ये पीओकेच्या माध्यमातून जम्मू -काश्मीरमध्ये घुसखोरी आणि दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवली होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App