अमरनाथ यात्रेदरम्यान दहशतवाद्यांचा कट उधळून लावला, बारामुल्लामध्ये दहशतवाद्यांचा साथीदार पकडला

विदेशी बनावटीच्या पिस्तुलासह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त.


विशेष प्रतिनिधी

श्रीनगर : अमरनाथ यात्रेदरम्यान सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर भागात सुरक्षा दलांनी एका संशयित दहशतवादी साथीदाराला अटक केली आहे. अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली.Terrorists arrested during Amarnath Yatra terrorists accomplice arrested in Baramulla



रविवारी रात्री उशिरा सोपोरमधील बोमाई भागातील माचीपोरा येथे पोलीस, लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) च्या जवानांनी संयुक्त चौकी उभारली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, तपासणीदरम्यान बोमईकडून माचीपोराच्या दिशेने येणारे एक वाहन थांबविण्यात आले. चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र सतर्क पथकाने त्याला पकडले.

त्यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव वाहिद उल जहूर असे असून तो जिल्ह्यातील रफियााबाद भागातील रहिवासी आहे. अधिका-यांनी सांगितले की, वाहनातून दोन तुर्की बनावटीची पिस्तूल, तीन मॅगझिन, 41 राउंड, एक सायलेन्सर, दोन चिनी बनावटीचे ग्रेनेड आणि स्फोटक बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

लष्कराच्या अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवाद्यांच्या सहकार्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास करण्यात येत आहे. अमरनाथ यात्रेदरम्यान दहशतवादी खोऱ्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र सुरक्षा दल त्यांचा कोणताही डाव यशस्वी होऊ देणार नाही.

Terrorists arrested during Amarnath Yatra terrorists accomplice arrested in Baramulla

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात