विशेष प्रतिनिधी
मुंबई : पहलगाम हल्ल्यांमध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून हिंदूंचे हत्याकांड घडविले. 29 हिंदूंना मारले. तिथले भयानक अनुभव सगळ्यांनी जाहीरपणे सांगितले. त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. पुण्यातल्या गनबोटे कुटुंबातल्या महिलांनी शरद पवारांच्या तोंडावर सांगितले की दहशतवाद्यांसमोर आम्ही कपाळावरच्या टिकल्या काढल्या. अल्ला हूॅं अकबर म्हटले तरी त्यांनी पुरुषांना गोळ्या घातल्या!!
एवढे होऊन देखील शरद पवारांना मात्र पहलगाम हल्ल्यामध्ये धर्माची चर्चा का होते??, असा सवाल पडला. ही धर्माची चर्चा शरद पवारांना टोचली म्हणून त्यांनी दहशतवादा संदर्भात धर्माची चर्चा करू नका, असा उपदेश करणारे वक्तव्य केले. मराठी माध्यमांनी हे वक्तव्य जोरकसपणे चालविले.
पहलगाम मध्ये पर्यटकांना धर्म विचारून गोळ्या घातल्या, या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, मला माहिती नाही यात काय तथ्य आहे??, जे प्रवासी होते, त्यात त्यांनी स्त्रियांना सोडलेलं दिसतंय. पुरुषांना गोळ्या घातल्या. पुण्यात दोघांचे मृत्यू झाले. त्यातील दोन लोकांच्या घरी मी गेलो होतो. घरी गेल्यावर त्या भगिनी तिथे होत्या. त्या मला सांगत होत्या. आम्हाला कुणालाही हात लावला नाही. आमच्या पुरुषांना गोळ्या घातल्या.
वास्तविक गनबोटे कुटुंबीयांमधल्या महिलांनी पवारांसमोर सर्व सत्य कथन केले होते. दहशतवाद्यांनी आम्हाला धर्म विचारला. कलमा पढायला लावला. त्यामुळे आम्ही पटापट कपाळावरच्या टिकल्या काढून फेकल्या. अल्ला हूॅं अकबर म्हणालो, तरी दहशतवाद्यांनी आमच्यातल्या पुरुषांना गोळ्या घातल्या, असे गनबोटे कुटुंबीयांमधल्या महिलांनी पवारांना सांगितले होते, तरी देखील आजच्या पत्रकार परिषदेत पवार खोटं बोलले.
धर्माची चर्चा आता का होतेय?
पहेलगाम येथील हल्ला ही धर्माविरोधी लढाई वाटते का??, असा प्रश्न विचारल्यावर शरद पवार यांनी “अचूक टायमिंग” साधले. ते म्हणाले, यापूर्वीही अतिरेक्यांनी हल्ले केले. पुलवामात हल्ला केला. या आधी तीन चार ठिकाणी अतिरेक्यांनी हल्ला केला. तेव्हा धर्माची चर्चा झाली नाही. आज का होतेय. घडलं ते वाईट आहे. आव्हान आहे देशाला. सक्तीने तोंड द्यावं लागेल. पण त्या निमित्ताने धार्मिक अडसर आणायचं काम करू नये!!
आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असं सांगितलं जात होतं, असा चिमटा त्यांनी काढला. पण ठीक आहे, उदाहरण पाहिलं आपण याचा अर्थ कुठे ना कुठे तरी अजूनही कमतरता आहे. ती कमतरता घालवली पाहिजे. देशावर हल्ला झाला असेल, सरकार गांभीर्याने निर्णय घेत असेल आणि कमतरता आहे असं मान्य करत असेल तर तातडीने ती कमतरता काढली पाहिजे. त्याही कामात आम्हा लोकांचं सरकारला सहकार्य राहील, अशी भूमिका शरद पवार यांनी जाहीर केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App