जम्मूच्या राजौरीत दहशतवाद्यांचे हल्ले, 5 हिंदूंची हत्या; पण फारूख अब्दुल्लांचा भाजपवर दोषारोप

वृत्तसंस्था

राजौरी / बडगाम : जम्मू- काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील डांगरी गावात दहशतवाद्यांनी नव वर्षाच्या पहिल्या दिवशी हिंदू घरांवर हल्ले करून एकाच कुटुंबातील चौघांची हत्या केली. दहशतवाद्यांनी आता पुन्हा त्याच ठिकाणी सोमवारी IED स्फोट करून एका मुलाला ठार मारले आहे. या स्फोटा 5 जण जखमी झाले आहेत. तरी देखील दहशतवादी हल्ल्यांसाठी माजी मुख्यमंत्री डॉ. फारूख अब्दुल्ला यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर दोषारोप केला आहे. Terrorist attacks in Jammu’s Rajouri, 5 Hindus killed; But Farooq Abdullah blames BJP

1 जानेवारीला जम्मू – काश्मीरच्या राजौरीच्या डांगरी गावात दहशतवाद्यांनी हिंदूंच्या 3 घरांवर हल्ला केला होता. एका घरात घुसून बेछूट गोळीबार करून 4 हिंदूंची हत्या केली. या गोळीबारात 9 जण जखमी झाले असून, त्यात तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. दहशतवाद्यांनी हिंदूंना वारंवार लक्ष्य केल्याच्या निषेधार्थ सोमवारी अनेक संघटनांनी राजौरी बंदची घोषणा केली होती. या आंदोलनादरम्यान IED स्फोट झाला.

पाच जण जखमी, एकाची प्रकृती गंभीर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारीला ज्या ठिकाणी दहशतवाद्यांनी हिंदूंवर गोळीबार केला होता, त्याच ठिकाणी सोमवारीही स्फोट झाला. या स्फोटात एका मुलाचा मृत्यू झाला आहे, तर पाच जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून एक आयईडीही जप्त केला आहे. दहशतवाद्यांनी इतरत्र आयईडी पेरले आहेत की नाही हे तपासण्यासाठी सुरक्षा दल आणि पोलीस जवळपासच्या घरांची तपासणी करत आहेत.

जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी राजौरी येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. लेफ्टनंट गव्हर्नर कार्यालयाने सांगितले की, दहशतवादी हल्ल्यात मारल्या गेलेल्या प्रत्येक नागरिकाच्या नातेवाईकांना 10 लाख रुपये एक्स-ग्रेशिया आणि सरकारी नोकरी दिली जाईल. त्याचबरोबर गंभीर जखमींना एक लाख रुपये देण्यात येणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंदर रैना यांनी डांगरी गावात पोहोचून पीडित कुटुंबीयांची भेट घेतली.

राष्ट्रीय तपास संस्था येणे डांगरीतील घटनेची दखल घेऊन तेथे आपली टीम पाठवली आहे मात्र दहशतवाद्यांनी हिंदूंना टार्गेट केल्याच्या मुद्द्यावर डॉ. फारूख अब्दुल्लांनी भाजपवरच दोषारोप केला आहे. देशभरात हिंदू विरुद्ध मुस्लिम असा माहोल पैदा करून सत्ताधारी देशातले वातावरण खराब करत आहेत. त्याचेच पडसाद जम्मू कश्मीर मध्ये उमटून दहशतवादी हल्ले वाढले आहेत, असा आरोप डॉ. फारूक अब्दुल्ला यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर केला आहे.

Terrorist attacks in Jammu’s Rajouri, 5 Hindus killed; But Farooq Abdullah blames BJP

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात