वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतात| विविध दहशतवादी कृत्ये करून पाकिस्तानात पळून गेलेला आणि सध्या त्याच देशात मोकाट फिरणारा दहशतवादी सय्यद सलाउद्दीन याच्या विरुद्ध दिल्ली कोर्टाने टेरर फंडिंग संदर्भात समन्स जारी केले आहे. सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने ही माहिती दिली आहे.Terror funding; HM terrorist syad salahuddin summoned for inquiry
सय्यद सलाउद्दीन हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आहे. त्याने आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांनी मिळून पाकिस्तान तसेच अन्य देशांमधून प्रचंड पैसे गोळा केले. त्या पैशाने शस्त्रास्त्रे विकत घेतली. दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले.
त्या पैशाचा वापर भारतात दहशतवादी कृत्य फैलावण्यासाठी केला, असे आरोप सय्यद सलाउद्दीन आणि त्याच्या इतर सहकारी दहशतवाद्यांवर आहेत. यासंबंधीचे तपशील डीडीने दिल्ली कोर्टात सादर केले. त्यानंतर दिल्ली कोर्टाने सय्यद सलाउद्दीन आणि इतर दहशतवाद्यांना हजर राहण्याचे समन्स बजावले आहे.
अर्थात या समन्सच व्यावहारिक पातळीवर फारसा उपयोग नाही. कारण सय्यद सलाउद्दीन आणि त्याचे सहकारी दहशतवादी सगळे पाकिस्तानात सध्या मोकाट फिरत आहेत. त्यांच्याविरुद्ध पाकिस्तानी कोर्टात केस चालल्या पण “पुरेशा पुराव्यांअभावी” हे सगळे दहशतवादी सुटले. त्यांना पाकिस्तानात काश्मिरी स्वातंत्र्यसैनिक म्हणून संबोधले जाते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App