Aam Aadmi Party : हरियाणात आम आदमी पार्टी अन् काँग्रेस आघाडीत दुफळी!


आप सर्व 90 जागांवर निवडणूक लढवण्यास तयार ; 1-2 दिवसात घोषणा केली जाईल


नवी दिल्ली : आम आदमी पार्टी (AAP) (Aam Aadmi Party )हरियाणातील सर्व 90 जागांवर आपले उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहे. पक्षाच्या प्रवक्त्या प्रियंका कक्कर यांनी शनिवारी सांगितले की, पक्ष हरियाणातील सर्व 90 जागा लढवणार आहे. येत्या 1-2 दिवसांत त्याची घोषणा होऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हरियाणात आप आणि काँग्रेसमधील युती तुटली झाली आहे.

प्रियांका कक्कर म्हणाली की, हरियाणात आमची तयारी चांगली आहे. सुनीता केजरीवाल जी अनेक दिवसांपासून हरियाणामध्ये सतत निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. मात्र, काँग्रेससोबत आमची चर्चा सुरू आहे. आत्ताच सांगणे घाईचे आहे.



आमची संघटना जमिनीवर मजबूत आहे. सुशील गुप्ता जी कुरुक्षेत्रात उत्तम काम करत आहेत. आम्हाला आशा आहे की या चर्चेतून काही निष्पन्न होईल.

निवडणूक आयोगाने हरियाणा ( Haryana ) विधानसभा निवडणुकीच्या तारखेत बदल केला आहे. 90 जागांसाठी आता 1 ऑक्टोबर ऐवजी 5 ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. याशिवाय 8 ऑक्टोबरला निकाल लागणार आहेत. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल 8 ऑक्टोबरला जाहीर करण्याची घोषणाही आयोगाने केली आहे. यापूर्वी दोन्ही राज्यांचे निकाल 4 ऑक्टोबरला लागणार होते.

Tension between Aam Aadmi Party and Congress alliance in Haryana

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात