वृत्तसंस्था
हैद्राबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे प्रमुख केसीआर चंद्रशेखर राव हे तेलंगण बाहेर आपल्या पक्षाची संघटना मजबूत करण्याच्या प्रयत्नात असताना दुसरीकडे तेलंगण काँग्रेसने मात्र राहुल गांधींच्या सॉफ्ट हिंदुत्वाचा काँग्रेस प्रयोग राज्यात करण्याचे ठरविले आहे. तेलंगण मधल्या 100 विधानसभा मतदारसंघांमध्ये तब्बल 1000 कोटी रुपये खर्च करून 100 राम मंदिरे बांधण्याचा संकल्प तेलंगण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांनी केला आहे. Telangana Congress president A Revanth Reddy toes Hindutva line, vows Ram temples in 100 constituencies
तेलंगणात केसीआर चंद्रशेखर राव हे दोन 2/3 बहुमतानिशी सध्या सत्तेवर आहेत. भाजप तिथे सध्या मुख्य विरोधी पक्ष आहे. काँग्रेसचे राजकीय अस्तित्व तिथे आधीच धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी तेलंगणात भारत जोडो यात्रा केली. तेव्हा सॉफ्ट हिंदुत्वाचा प्रयोग त्यांनी तिथे केला. त्यांनी विविध मंदिरांना भेटी दिल्या. आता त्याच प्रयोगाचा पुढचा अंक काँग्रेसच्या हाथ से हाथ जोडो अभियानात रेवंत रेड्डी सादर करत आहेत. त्यामुळे त्यांनी तेलंगणा मधल्या 100 विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येकी 10 कोटी रुपये म्हणजे तब्बल 1000 कोटी रुपये खर्च करून 100 राम मंदिरे बांधण्यासाठी संकल्प केला आहे.
मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी यदाद्री नरसिंह मंदिर बांधून आपले सगळे लक्ष आणि सरकारी पैसा तिकडे वळवला आहे. पण भद्राद्री या मंदिरांच्या शहराकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. भद्राद्री शहरामधील मंदिरांच्या विकासासाठी काँग्रेस सत्तेवर आली तर 100 कोटी रुपये निधी देऊ, असे आश्वासनही रेवंत रेड्डी यांनी दिले आहे.
एकीकडे चंद्रशेखर राव हे तेलंगण बाहेर भारत राष्ट्र समितीचे संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसने मंदिरांच्या बांधणीचा आणि विकासाचा कार्यक्रम हाती घेऊन राहुलजींच्या सॉफ्ट हिंदुत्वाचा प्रयोग तेलंगणात सुरू केला आहे. या प्रयोगाला मतदार कसा प्रतिसाद देणार?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App